
पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला (फोटो सौजन्य - iStock - फोटो प्रातिनिधिक आहे)
वृत्तानुसार, आतापर्यंत 3 दहशतवादी मारले गेले आहेत आणि उर्वरितांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दल संपूर्ण कॉम्प्लेक्सची तपासणी करत आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना हा हल्ला झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने सरकारसोबतचा युद्धबंदी तोडली आणि सुरक्षा दल, पोलिस आणि कायदा अंमलबजावणी संस्थांवर हल्ला करण्याची धमकी दिली. तेव्हापासून, देशात अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…
Reports indicate a major attack is underway on Pakistani forces at the FC Headquarters in Peshawar, Khyber Pakhtunkhwa. Two loud explosions have been heard, and heavy gunfire is ongoing. A suicide bombing is suspected, though details are still emerging. Information on casualties… pic.twitter.com/9vOWMkrhkI — Raj anand (@Rajanand7654) November 24, 2025
नक्की काय घडले?
जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी ८:१० वाजता पेशावरमधील फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर, सुनहेरी मस्जिद रोड बंद करण्यात आला आणि संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की या हल्ल्यात दोन स्फोट झाले आणि हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्यामुळे दहशत निर्माण झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराला वेढा घातला. या हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, एका आत्मघातकी हल्लेखोराने मुख्यालयाच्या गेटवर स्वतःला उडवले आणि त्यानंतर गोळीबार झाला.
सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी ही घटना पाहिल्याचा दावाही केला आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानातील पेशावरमधील फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयावर हल्ला करण्यात आला. असे वृत्त आहे की, परिसरात दोन शक्तिशाली स्फोट झाले तेव्हा ही घटना घडली. ऑनलाइन फिरणाऱ्या अनेक व्हिडिओंमध्ये सतत गोळीबाराचा आवाज येत असल्याचे दिसून येते.