Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Fuel Crisis: 15 ऑगस्टपासून पाकिस्तानात पेट्रोल पंप ठप्प होणार? डीलर्सचा सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम

पाकिस्तानातील पेट्रोल पंप डीलर्सनी, ८% मार्जिनसह त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास १५ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संप करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सरकारला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 12, 2026 | 04:42 PM
Pakistan Petroleum Dealers Association PPDA

Pakistan Petroleum Dealers Association PPDA

Follow Us
Follow Us:
  • १५ ऑगस्टपासून अनिश्चितकालीन संप
  • ७२ तासांचा अल्टिमेटम व ८% मार्जिनची मागणी
  • दैनिक किंमत धोरणाला तीव्र विरोध

शेजारील देश पाकिस्तानात इंधनाचा एक मोठा नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (PPDA) आपल्या विविध मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेत सरकारला ७२ तासांचा थेट अल्टिमेटम जारी केला आहे. जर या कालावधीत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १५ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी ६ वाजेपासून संपूर्ण पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील, असा इशारा डीलर्स संघटनेने दिला आहे. या घोषणेमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानातील सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, देशभरात वाहतूक आणि इंधन पुरवठा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कराची येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत पीपीडीएचे (PPDA) अध्यक्ष मलिक खुदा बख्श यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह ही मोठी घोषणा केली. देशभरातील सर्व डीलर्सच्या बैठकीनंतर हा एकमुखाने निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या मते, सध्या पाकिस्तानातील १४,००० हून अधिक पेट्रोल पंप मालक सरकारच्या धोरणांमुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यवसाय चालवणे आता त्यांच्यासाठी अशक्य झाले असून, सर्व सदस्यांकडून त्वरित आणि ठोस कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे. त्यामुळेच जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत एकही पेट्रोल पंप सुरू केला जाणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.

सरकारने दिलेली मुदत संपली; डीलर्सचा धैर्य सुटले

यापूर्वी जुलै महिन्यातही पेट्रोल पंप डीलर्सनी अशाच प्रकारे देशव्यापी संप पुकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ७ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक आणि पीपीडीए प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चे दरम्यान, सरकारने दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्व समस्यांवर तातडीने आढावा घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून डीलर्सनी संप पुढे ढकलला होता. मात्र, सरकारला दिलेली मुदत संपूनही कोणतीही ठोस उकल न निघाल्याने डीलर्सनी पुन्हा एकदा आक्रमक पाऊल उचलत सरकारला अंतिम इशारा दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Imran Khan Health : सर्वात मोठी बातमी! माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू; जाणून घ्या कुणी केला ‘हा’ मोठा दावा

डीलर्स संघटनेची मुख्य मागणी म्हणजे पेट्रोलच्या किरकोळ विक्रीवर मिळणारा त्यांचा नफा (मार्जिन) वाढवून तो ८ टक्के करण्यात यावा. देशात वेगाने वाढणारी महागाई, वीज आणि गॅसच्या दरांमधील अफाट वाढ, कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार आणि पंपांच्या दैनंदिन देखभालीचा खर्च यांमुळे सध्या मिळणारे कमिशन अत्यंत अपुरे पडत असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे. सध्याच्या नफ्यामध्ये व्यवसाय पुढे चालवणे आणि कर्मचाऱ्यांचे पगार देणे अशक्य झाले असून, पेट्रोल पंप चालकांचे खेळते भांडवल (Working Capital) झपाट्याने संपत चालले आहे.

दररोज बदलणाऱ्या इंधन दरांचा मोठा फटका

पेट्रोलियम डीलर्सच्या असंतोषाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान सरकारने लागू केलेली इंधनाची ‘दैनिक किंमत प्रणाली’ (Daily Price Mechanism) हे आहे. या प्रणालीनुसार इंधनाचे दर दररोज बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा स्थानिक पातळीवर दर अचानक कमी झाल्यास, डीलर्सकडे आधीच महागड्या दराने घेतलेला जो जुना साठा (Inventory) पडून असतो, त्यावर त्यांना थेट मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यामुळे लहान आणि मध्यम स्वरूपाच्या पेट्रोल पंप चालकांचे मोठे नुकसान होत असून त्यांचा व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यामुळे दैनिक किंमत धोरणाचा तातडीने पुनर्विचार करावा किंवा ही पद्धत रद्द करावी, अशी मागणी पीपीडीएने केली आहे.

याशिवाय, पीपीडीएने तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) वाटप धोरणावरही (Company Allocation Policy) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संघटनेच्या कार्यकारी समितीने हे धोरण अत्यंत भेदभावपूर्ण आणि सामान्य डीलर्सच्या व्यावसायिक हिताच्या विरोधात असल्याचे म्हंटले आहे. काही विशिष्ट घटकांना फायदा पोहोचवण्यासाठी हे नियम बनवण्यात आले असून यात पारदर्शकता आणि न्याय्यता आणण्याची गरज असल्याचे डीलर्सनी स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : D.Y. Chandrachud: युक्रेनविरुद्ध रशियाच्या बाजूने भारताचा दिग्गज कायदेपंडित मैदानात; डी. वाय. चंद्रचूडांवर मोठी ‘ही’ जबाबदारी

१५ ऑगस्टला पाकिस्तानात काय घडणार?

सरकारसमोर आता पुढील ७२ तासांच्या आत डीलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे. जर या वेळेत दोन्ही बाजूंमध्ये कोणताही करार झाला नाही, तर १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता संपूर्ण पाकिस्तानात १४,००० हून अधिक पेट्रोल पंपांचे कुलूप उघडले जाणार नाही. १५ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असल्यामुळे या दिवशी होणाऱ्या संभाव्य संपामुळे देशातील दळणवळण, मालवाहतूक आणि दैनंदिन व्यावसायिक उलाढाल पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता पाकिस्तान सरकार या संकटातून मार्ग कसा काढते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pakistan petrol pump dealers indefinite strike august 15 ppda ultimatum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Fuel Shortage
  • Pakistan News
  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
1

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
2

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार
3

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले
4

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.