Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट

Pakistan News: आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या आशेने, पाकिस्तान तेलाच्या शोधाला चालना देण्यासाठी सिंध किनाऱ्यावर एक कृत्रिम बेट बांधत आहे. पाकिस्तान मोठे स्वप्न पाहत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 20, 2025 | 11:22 AM
Pakistan plans a Sindh offshore island to boost oil exploration

Pakistan plans a Sindh offshore island to boost oil exploration

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान सिंध किनाऱ्यावर तेलाच्या शोधासाठी सुमारे 30 किमी अंतरावर कृत्रिम बेट बांधत आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य तेलसाठ्यांबद्दल रस व्यक्त केल्यानंतर प्रकल्पाला वेग मिळाला.
  • पीपीएल फेब्रुवारीपर्यंत कृत्रिम बेट पूर्ण करणार असून त्यानंतर तात्काळ खोदकाम सुरू होणार आहे.

Pakistan Building Artificial Island for Oil Exploration : पाकिस्तानची(Pakistan) डळमळीत अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि अन्नटंचाई यामुळे देश सतत संकटात असल्याचे चित्र जगासमोर आहे. पीठ-तांदळाच्या आयातीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या पाकिस्तानला आता आर्थिक पुनरुज्जीवनाची एकमेव आशा ‘तेल शोध’(Oil Exploration) वाटू लागली आहे. या आशेवर स्वार होऊन पाकिस्तानने सिंधच्या किनाऱ्यावर कृत्रिम बेट बांधण्याचा मोठा प्रकल्प सुरू केला आहे. या बेटावरून ऑफशोअर ड्रिलिंग करून समुद्रातील संभाव्य तेलसाठे शोधण्याची तयारी सुरू आहे.

ट्रम्प यांच्या रसामुळे प्रकल्पाचा वेग वाढला

पाकिस्तानच्या तेलसाठ्यांबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रस दाखवल्यानंतर इथल्या सरकारने आणि तेल कंपन्यांनी प्रकल्पाला अचानक गती दिली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील भौगोलिक अभ्यासांत सिंध किनाऱ्यावरील ऑफशोअर बेसिनमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन साठ्यांची शक्यता दिसून आली आहे. हीच शक्यता पाकिस्तानसाठी ‘आर्थिक जीवनदान’ म्हणून दाखवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PakExposed : ‘लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत…’; माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या

कृत्रिम बेटावरून तेल शोधण्याची पाकिस्तानची पहिलीच वेळ

पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड (PPL) हा प्रकल्प पुढे नेत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे कृत्रिम बेट समुद्रसपाटीपासून अंदाजे सहा फूट उंचीवर तयार केले जात आहे, जेणेकरून उंच भरती आणि समुद्री लाटा शोध प्रक्रियेत अडथळा आणू शकणार नाहीत. हे बेट सिंधच्या किनाऱ्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असेल, जेथे खोदकाम करणे सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक सोयीचे असेल. पीपीएलचे महाव्यवस्थापक अर्शद पालेकर यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्णपणे अबू धाबीच्या कृत्रिम बेट मॉडेलपासून प्रेरित आहे, ज्या मॉडेलने तेलशोधात उत्कृष्ट यश मिळवले आहे. पाकिस्तानमध्ये या प्रकारचे तंत्रज्ञान प्रथमच लागू होत आहे, त्यामुळे हे पाऊल देशासाठी ऐतिहासिक मानले जात आहे.

फेब्रुवारीपर्यंत बेट तयार; त्यानंतर लगेच ड्रिलिंग

इस्लामाबादमध्ये झालेल्या तेल-वायू परिषदेत पालेकर यांनी माहिती दिली की, बेटाचे बांधकाम वेगाने चालू असून फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण होईल. त्यानंतर तात्काळ ड्रिलिंगचा पहिला टप्पा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ड्रिलिंगमधून मिळणाऱ्या माहितीवर पाकिस्तानचे आर्थिक भविष्य अवलंबून असेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’

आर्थिक संकटातून सुटकेची शेवटची आशा?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या विदेशी कर्ज, अन्नटंचाई, महागाई आणि बेरोजगारीच्या फेऱ्यात अडकली आहे. अन्नधान्य आयातीवर अवलंबून राहिल्याने सामान्य जनतेवरचा भार अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत ‘तेलाचा शोध’ म्हणजे पाकिस्तानसाठी एक मोठी शक्यता — ज्यातून देशाला आर्थिक स्थैर्य, विदेशी गुंतवणूक आणि ऊर्जा स्वयंपूर्णतेची संधी मिळू शकते. मात्र, अनेक तज्ज्ञांचे मत आहे की तेलसाठे सापडले तरच हा प्रयत्न फलीभूत ठरेल; अन्यथा हा प्रकल्प पाकिस्तानसाठी आणखी आर्थिक ओझे ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान कृत्रिम बेट का बांधत आहे?

    Ans: तेलसाठे शोधण्यासाठी सुरक्षित ऑफशोअर ड्रिलिंग करण्यासाठी.

  • Que: हे बेट कधी तयार होणार?

    Ans: फेब्रुवारीपर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे.

  • Que: प्रकल्पाला वेग का आला?

    Ans: ट्रम्प यांनी संभाव्य तेलसाठ्यांबद्दल रस व्यक्त केल्यानंतर.

Web Title: Pakistan plans a sindh offshore island to boost oil exploration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • International Political news
  • pakistan
  • shahbaaz sharif

संबंधित बातम्या

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
1

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
2

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ
3

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या
4

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.