Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCA Hague: ‘भारताचे जलविद्युत प्रकल्प आम्हाला त्रास देण्यासाठीच’, पाकिस्तानचा लवाद न्यायालयात नवा कांगावा; भारताने आरोप फेटाळले

IWT: स्थायी लवाद न्यायालयाने (PCA) सिंधू पाणी करारावरील (IWT) एक महत्त्वपूर्ण सुनावणी पूर्ण केली आहे. या सुनावणीदरम्यान, पाकिस्तानने अशा प्रमुख प्रकल्पांना लक्ष्य केले, जे अद्याप लवाद संस्थांसमोर आलेले नाहीत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 29, 2026 | 11:57 AM
pakistan protests india hydro projects at pca indus waters treaty latest 2026

pakistan protests india hydro projects at pca indus waters treaty latest 2026

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा नवा कांगावा
  • भारताची आक्रमक भूमिका
  • पाणी अडवण्याची भीती

Indus Waters Treaty PCA hearing 2026 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘सिंधू पाणी करार’ (Indus Waters Treaty) पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. हेग येथील स्थायी लवाद न्यायालयात (PCA) नुकतीच या करारावर एक महत्त्वपूर्ण सुनावणी पूर्ण झाली. या सुनावणीत नेहमीप्रमाणे पाकिस्तानने भारतावर पाणी चोरल्याचा आणि प्रकल्पांच्या नावाखाली पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, भारताने या प्रक्रियेलाच अवैध ठरवत आपला विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे.

‘किरू’ आणि ‘पाकल डुल’ प्रकल्पांवरून पाकिस्तानची पोटदुखी

सुनावणीदरम्यान पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या ६२४ मेगावॅटच्या ‘किरू’ जलविद्युत प्रकल्पाचा विशेष उल्लेख केला. पाकिस्तानच्या वकिलांनी ८१ पानांच्या टिपणीत असा युक्तिवाद केला की, भारत या प्रकल्पांद्वारे गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा करत आहे. भारताचा हा बांधकाम कार्यक्रम “प्रचंड मोठा” असून तो कराराच्या अटींचे उल्लंघन करतो, असा कांगावा पाकिस्तानने केला. विशेष म्हणजे, ज्या प्रकल्पांवर अद्याप जागतिक बँकेने कोणताही आक्षेप घेतलेला नाही, त्यांनाही पाकिस्तानने आता वादात ओढले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Economy : ‘आता आमचं आम्ही बघू!’ UAEचा OPECला रामराम; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठ्या बदलाचे संकेत

भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’ अन् कामाचा वेग

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिंधू जल करार निलंबित करण्याची कठोर भूमिका घेतली होती. तेव्हापासून भारताने काश्मीरमधील रखडलेल्या नदी प्रकल्पांना युद्धपातळीवर गती दिली आहे. १,००० मेगावॅटचा ‘पाकल डुल’ आणि ‘किरू’ प्रकल्प यावर्षीच्या अखेरीस पूर्ण करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. २०२७ पर्यंत ‘क्वार’ आणि ‘परनाई’ प्रकल्पही पूर्ण होणार आहेत. भारताची ही वेगाने चाललेली प्रगती पाहून पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांनी “प्रणालीचा गैरवापर” होत असल्याचा आरोप पीसीए समोर केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Royal Visit: ‘माझ्या आईच किंग चार्ल्सवर प्रेम…’, व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर आठवणींची मधुर गुंफण; ट्रम्प यांची मिश्किल टोलेबाजी

लवाद न्यायालयात काय घडले?

पाकिस्तानच्या वकिलांनी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सांगितले की, भारत जाणीवपूर्वक पश्चिम नद्यांवरील (चिनाब, झेलम, सिंधू) प्रकल्पांद्वारे पाणी साठवणुकीची क्षमता वाढवत आहे. त्यांच्या मते, भारताने जलाशयाचे क्षेत्रफळ आणि तांत्रिक माहिती लपवून ठेवली आहे. पाकिस्तानने अशी मागणी केली आहे की, कोणताही पर्यावरणीय धोका टाळण्यासाठी ‘पर्यावरणीय प्रवाहा’च्या (Environmental Flow) तरतुदींनुसारच पाण्याची गणना केली जावी. तथापि, भारताने या संपूर्ण सुनावणीवर बहिष्कार टाकून हे स्पष्ट केले आहे की, हा करार केवळ द्विपक्षीय पातळीवरच हाताळला जावा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीसीए (PCA) म्हणजे काय आणि तिथे काय चर्चा झाली?

    Ans: पीसीए म्हणजे 'स्थायी लवाद न्यायालय' (Permanent Court of Arbitration). येथे भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी वाटपावरून, विशेषतः किशनगंगा आणि राटले प्रकल्पांवरील तांत्रिक वादावर सुनावणी झाली.

  • Que: पाकिस्तानने कोणत्या भारतीय प्रकल्पांना लक्ष्य केले आहे?

    Ans: पाकिस्तानने किरू (६२४ MW), पाकल डुल (१००० MW), बागलिहार आणि क्वार या जलविद्युत प्रकल्पांवर आक्षेप घेतला आहे.

  • Que: भारताने पीसीएच्या सुनावणीवर बहिष्कार का टाकला?

    Ans: भारताचे म्हणणे आहे की, सिंधू पाणी करारातील वादांचे निवारण करण्यासाठी करारातच 'तटस्थ तज्ज्ञ' नेमण्याची तरतूद आहे, त्यामुळे पीसीए सारख्या तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप भारत मानत नाही.

Web Title: Pakistan protests india hydro projects at pca indus waters treaty latest 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Indus Water Treaty
  • World news

संबंधित बातम्या

फ्रान्समध्ये पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! G-7 परिषदेदरम्यान झाला महत्त्वाचा संवाद; पाहा Video
1

फ्रान्समध्ये पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! G-7 परिषदेदरम्यान झाला महत्त्वाचा संवाद; पाहा Video

US Iran Peace Deal : अमेरिकेशी शांतता करारावरुन इराणमध्ये वाद; अराघचींच्या राजीनाम्याची मागणी
2

US Iran Peace Deal : अमेरिकेशी शांतता करारावरुन इराणमध्ये वाद; अराघचींच्या राजीनाम्याची मागणी

India-France Relations : भारताला मोठा झटका! फ्रान्सने  पिनाका रॉकेट प्रणाली खरेदीचा प्रस्ताव फेटाळला, कारण काय?
3

India-France Relations : भारताला मोठा झटका! फ्रान्सने पिनाका रॉकेट प्रणाली खरेदीचा प्रस्ताव फेटाळला, कारण काय?

India-Slovakia Relations : पंतप्रधान मोदींचा स्लोव्हाकिया दौरा ठरला ऐतिहासिक; ‘या’ महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या
4

India-Slovakia Relations : पंतप्रधान मोदींचा स्लोव्हाकिया दौरा ठरला ऐतिहासिक; ‘या’ महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.