Pakistan signals willingness to resolve Kashmir issue, Indus Water Treaty, and terrorism with India
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी संघर्षावर अखेर विराम लागला आहे. शनिवारी (10 मे) दोन्ही देशांच्या डीजीएमओने युद्धबंदीच्या प्रस्तावावर चर्चा केली. दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली. त्यानंतर 10 मे च्या सायंकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली. सध्या तणावच्या भागांमध्ये परिस्थितीत शांत होत आहे. याच वेळी तणाव शांत होत असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी मोठे खळबळजनतक विधान केले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी म्हटले आहे की, काश्मीर वाद, सिंधू पाणी करार आणि दहशतवाद या तीन मुद्द्यांवर शेजारी देश भारताशी चर्चा करायची आहे. भविष्यात या मुद्द्यांवर शेजारी देशांमध्ये चर्चा केली जाऊ शकते.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी हे वक्तव्य भारतासोबतच्या शनिवारी (10 मे) झालेल्या युद्धबंदी करारानंतर आले. पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी आणि शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर आसिफ ख्वाजा यांनी हे विधान केले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान भारतासोबतच्या युद्धबंदीसाठी सहमत आहे. मात्र काश्मीर, सिंधू पाणी करारा आणि दहशतवाद हे तीन गुंतागुतींचे मुद्दे आहेत. यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
भारताने पाकिस्तानसह युद्धबंदीसाठी चर्चा दर्शवली आहे. परंतु सिंधू पाणू करार रद्दच केला आहे. ख्वाजा यांनी म्हटले की, या मुद्द्यावंर भारताशी अनेक वेळा चर्चा झाली आहे. परंतु यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच दहशतवाद आणि काश्मीर मुद्द्यावर देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच वाद राहिला आहे. भविष्यात या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग मोकळा झाला आहे आणि पाकिस्तान याचे स्वागत करतो. परंतु ख्वाजा यांनी निश्चितपणे काहीही सांगणे कठीण असल्याचेही म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात निरापराध लोकांचा बळी गेला. यामध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाली.
दरम्यान जागतिक स्तरावरुन दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला जात होता. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरेबिया, यएई, या देशांनी पहलगामच्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच भारत आणि पाकिस्तानला शांततेच्या मार्गाने संवाद सोडवण्यास सांगितला. तर चीन आणि तुर्की, अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला.