Pakistan Sudan Army Deal Islamic cooridor in red sea and Indian Pacific Ocean
Pakistan news in Marathi : इस्लामाबाद : एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने (Pakistan) सुदानच्या लष्करी सरकारसोबत मोठा शस्त्रास्त्र करार केला आहे. यामुळे भारतासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ह करार करण्यात आला असून पाकिस्तान सुदानच्या लष्करी सरकारला शस्त्रे पुरवणार आहे. यामुळे लाल समुद्रात इस्लामिक राष्ट्रांची एक नवी युद्ध भूमी तयार होण्याची शक्यता आहेत.
एकीकडे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्व्सत केलेल्या दहशतवाद्यांची तळे पुन्हा उभारत आहे. ISI या गुप्त लष्करी संघटनेच्या मदतीने आणि लष्कराकडून या दहशतवाद्यांना आधुनिक शस्त्रांचे ट्रेनिंग दिले जात आहे. अशा परिस्थिती सुदानलाही शस्त्रे पुरवण्यासाठी पाकिस्तानने करार केला आहे.
पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होणार रवाना; भारत-जपान आर्थिक संबंधास मिळणार नवी गती
या करारांतर्गत पाकिस्तान सुदानच्या सशस्त्र दलांना (SAF) आधुनिक शस्त्रे पुरवणार आहे.
पाकिस्तानने यामागचा हेतू सांगताना देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे. परंतु हा भाग पाकिस्तानच्या आणि चीनच्या आफ्रिकी धोरणाचा आहे. यामध्ये पाकिस्तान फ्रंट सप्लायरची भूमिका घेत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा करार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहमतीने उच्चस्तरावर करण्यात आला आहे. नुकतेच सुदानचे हवाई दल कमांडर लेफ्टनंट एक शिष्टमंजळ घेऊन पाकिस्तानच्या भेटीला पोहोचले आहे. येथे त्यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री आणि हवाई दलाच्या प्रमुखांची भेट घेतली आहे.
हा करार अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा सुदानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. तसेच अमेरिका आणि युरोपीय देशांनी सुदानमध्ये कोणत्याही पक्षाला शस्त्र विक्रीवर बंदी घातली आहे. अशा परिस्थिती पाकिस्तानचा हा करार धोकादायक मानला जात आहे.
हा करार भारतासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे. यामुळे भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष करुन पाकिस्तान-तुर्की-कतार-चीन या सुदानला शस्त्रे पुरवणारे अक्ष बनत आहेत. तसेच यामुळे लाल समुद्रात एक भाारतविरोधी इस्लामिक कॉरिडॉरही तयार होत आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठा, जागतिक व्यापार आणि नौदल हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.
भारतासाठी धोक्याची घंटा? बांगलादेश चीनकडून खरेदी करणार J-10 लढाऊ विमाने?