Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे

Operation Sindoor : पाकिस्तानी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मे 2025 च्या भारत-पाक संघर्षाची खोटी कहाणी समाविष्ट केली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला विजेता आणि भारताला आक्रमक म्हणून चित्रित केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 25, 2025 | 10:01 PM
Pakistani textbooks misrepresentation,Operation Sindoor

Pakistani textbooks misrepresentation,Operation Sindoor

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानने शालेय अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरची खोटी कहाणी समाविष्ट केली आहे.

  • या कथेत पाकिस्तान स्वतःला विजेता आणि भारताला आक्रमक म्हणून दाखवत आहे.

  • प्रत्यक्ष वास्तव मात्र अगदी वेगळे असून, पाकिस्तानचे दावे प्रचारापुरते खोटे दावे असल्याचे उघड झाले आहे.

Operation Sindoor : पाकिस्तान सरकारने नुकताच एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. देशातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता “ऑपरेशन सिंदूर” ( Operation Sindoor) नावाने ओळखल्या जाणाऱ्या मे २०२५ मधील भारत-पाक संघर्षाची (india pakistan war) कहाणी समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु ही कहाणी वस्तुस्थितीवर आधारित नसून, पाकिस्तानने आपल्या सोयीप्रमाणे रंगवलेली व खोट्या दाव्यांनी सजवलेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार, मुलांना शिकवले जाणार आहे की भारताने कोणतेही कारण नसताना पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानने शौर्याने प्रत्युत्तर देत विजय मिळवला. भारताला आक्रमक तर पाकिस्तानला विजेता म्हणून दाखवले आहे. मात्र प्रत्यक्ष घडलेले वास्तव अगदी उलट होते.

पाकिस्तानचे दावे आणि वास्तव

दावा १: भारताने अचानक हल्ला केला

पाठ्यपुस्तकांत लिहिले गेले आहे की ७ मे २०२५ रोजी भारताने काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे खोटे कारण पुढे करून अचानक पाकिस्तानवर हल्ला केला. वास्तव: प्रत्यक्षात, २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची हत्या केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. भारतीय कारवाई दहशतवाद्यांविरोधात होती, पाकिस्तानी सैन्य किंवा नागरी क्षेत्राविरोधात नव्हती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America News : 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊनची शक्यता; ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या दाव्यानंतर नवा राजकीय कलह

दावा २: पाकिस्तानी सैन्याचे शौर्य

दुसरा दावा असा आहे की पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची चार राफेल विमाने पाडली आणि अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केले.
वास्तव: पाकिस्तानने याचे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. उलटपक्षी, पाकिस्तानने अमृतसर, जम्मू आणि श्रीनगरसह नागरी भागांवर ड्रोन हल्ले केले. प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोरमधील HQ9 हवाई संरक्षण प्रणाली तसेच सियालकोट आणि इस्लामाबादमधील महत्त्वाचे ठिकाणे नष्ट केली.

दावा ३: २६ भारतीय तळ उद्ध्वस्त

पाकिस्तानचा तिसरा मोठा दावा म्हणजे १० मे रोजी त्यांनी २६ भारतीय हवाई तळ उद्ध्वस्त केले.

वास्तव: प्रत्यक्षात भारतानेच पाकिस्तानचे मुरीदके, नूर खान, रफीकी, सरगोधा, चकलाला, रहीम यार खान यांसारखे हवाई तळ उद्ध्वस्त केले.अगदी रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावरही भारतीय कारवाई झाल्याचे पुरावे उपग्रह प्रतिमांतून स्पष्ट दिसत आहेत.

Pakistani version of the recent events in a text book. pic.twitter.com/bs37Rm9asL — Indian Tech & Infra (@IndianTechGuide) July 29, 2025

credit : social media

दावा ४: भारताने युद्धबंदीची विनंती केली

पाकिस्तानच्या पुस्तकांत भारताने मोठ्या नुकसानीनंतर युद्धबंदीची विनंती केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्यानुसार पाकिस्तानने ती मान्य केली असे लिहिले आहे. वास्तव: वस्तुस्थिती अगदी उलट आहे. भारताने कधीच मध्यस्थी मान्य केली नाही. अगदी पाकिस्तानचे तत्कालीन उपपंतप्रधान इशाक दार यांनीसुद्धा हे मान्य केले आहे.

दावा ५: जनरल असीम मुनीर यांचा सन्मान

पुस्तकांत पाकिस्तानचे जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देणे ही युद्धातील ऐतिहासिक उपलब्धी म्हणून दाखवले आहे.
वास्तव: प्रत्यक्षात हा निर्णय राजकीय व प्रचारात्मक होता. युद्धातील विजयाचा संदेश देण्यासाठी आणि जनतेचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते.

खोटा इतिहास, भविष्यावर परिणाम?

शालेय पातळीवर असा विकृत इतिहास शिकवला गेला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. पाकिस्तानातील नव्या पिढीला सत्याऐवजी खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवायला शिकवले जाईल. यामुळे केवळ भारताबद्दल द्वेष निर्माण होणार नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी ढासळेल. इतिहास हा वास्तवाचा आरसा असावा, परंतु पाकिस्तानमध्ये तो प्रचाराचे साधन बनला आहे. मुलांना सत्यापासून दुरावून खोट्या विजयकथांचा अभिमान वाटावा, हीच खरी धोक्याची बाब आहे.

भारताची भूमिका

भारताने या संपूर्ण संघर्षात संयम आणि स्पष्टता दाखवली. दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मर्यादित कारवाई करून भारताने दाखवून दिले की त्याचे लक्ष्य पाकिस्तानी जनता किंवा सैन्य नव्हे, तर दहशतवाद आहे. जगभरात भारताच्या या भूमिकेचे स्वागत झाले. आज पाकिस्तानने शालेय शिक्षणात खोट्या गोष्टी घुसडल्या आहेत, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तथ्ये लपवता येत नाहीत. उपग्रह प्रतिमा, जागतिक मीडिया अहवाल आणि तज्ज्ञांच्या नोंदी यातून वास्तव स्पष्ट होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News: ‘ओली असोत किंवा देउबा…’ कोणताही नेता आता नेपाळमधून पळून जाऊ शकणार नाही; कार्की सरकारची जोरदार तयारी

ऑपरेशन सिंदूरवर खोटे दावे

पाकिस्तानी शालेय पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झालेले “ऑपरेशन सिंदूर” हे इतिहास नसून एक प्रचार आहे. भारताला आक्रमक दाखवून पाकिस्तान स्वतःला विजेता म्हणत असला तरी सत्य नेहमीच उघड होते. भविष्यातील पिढ्यांना सत्य इतिहास शिकवला गेला नाही तर त्याचे परिणाम पाकिस्तानलाच भोगावे लागतील.

Web Title: Pakistani textbooks on operation sindoor falsely depict pakistan as victor and india as aggressor in the 2025 conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Pakistan News

संबंधित बातम्या

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
1

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन
2

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन

Indus Waters Treaty :  सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त
3

Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त

इस्लामाबाद स्फोटानंतर पाकिस्तानचा इशारा! भारताला जबाबदार धरत अफगाणिस्तानवर हल्ल्याची दिली धमकी
4

इस्लामाबाद स्फोटानंतर पाकिस्तानचा इशारा! भारताला जबाबदार धरत अफगाणिस्तानवर हल्ल्याची दिली धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.