Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ishaq Dar : पाकिस्तानात ‘पडझड’! इराण युद्धाच्या चर्चेत उपपंतप्रधानांची मोठी फजिती; रेड कार्पेटवर पसरले, VIDEO VIRAL

Pakistan Iran Peace Talks: इस्लामाबादमध्ये इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या स्वागत समारंभादरम्यान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार रेड कार्पेटवर कोसळले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 30, 2026 | 01:42 PM
pakistan deputy pm ishaq dar falls on red carpet egypt minister iran peace talks 2026

pakistan deputy pm ishaq dar falls on red carpet egypt minister iran peace talks 2026

Follow Us
Follow Us:
  • रेड कार्पेटवर ‘फजिती’
  • इराण युद्ध आणि मध्यस्थी
  • राजनैतिक हालचालींना खीळ

Ishaq Dar fall on red carpet video : जागतिक राजकारणात स्वतःला ‘मध्यस्थ’ म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान खाली घालावी लागली आहे. मध्य-पूर्वेतील इराण-अमेरिका युद्ध (US-Israel Iran War) थांबवण्यासाठी इस्लामाबादमध्ये महत्त्वाच्या बैठका सुरू असतानाच, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांचा एक अत्यंत लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने पाकिस्तानच्या (Pakistan) राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

रेड कार्पेटवर नेमकं काय घडलं?

रविवारी इस्लामाबादमध्ये एका भव्य राजनैतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बदर अब्देललाटी हे या बैठकीसाठी पाकिस्तानात पोहोचले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी इशाक दार रेड कार्पेटवर पुढे सरसावले. मात्र, पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला आणि ते थेट जमिनीवर कोसळले. समोर इजिप्तचे प्रतिनिधी आणि बाजूला सुरक्षा रक्षक असताना घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तिथे शांतता पसरली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ धावत जाऊन त्यांना उचलले, पण तोपर्यंत कॅमेऱ्यात ही कैद झालेली ही घटना वारंवार पाहिली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Border: नेपाळमध्ये सत्तांतर होताच भारतीय सीमेवर हालचालींना वेग; बालेन शाह सरकारचा मोठा ‘बॉर्डर प्लॅन’, वाचा सविस्तर

इराण युद्धावरील चर्चेला ‘बॅड लक’?

ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया हे देश इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी ‘दोन दिवसीय’ शांतता चर्चेत गुंतले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी पंतप्रधान शहबाज शरीफ नियमित संवाद साधत आहेत. पाकिस्तानला या युद्धात मोठी भूमिका बजावायची आहे, परंतु उपपंतप्रधानांच्या या शारीरिक अपघाताकडे आता राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांमुळे देशाच्या नेत्यांच्या गांभीर्याबद्दल आणि व्यावसायिक प्रतिमेबद्दल नकारात्मक संदेश जातो.

نائب وزیراعظم اسحاق ڈار دفتر خارجہ میں مہمان وزرا خارجہ کا استقبال کرتے ہوئے فرش پر گر گئے۔ شکر ہے محفوظ رہے!!! pic.twitter.com/v82rMi3KOp — Nadir Baloch (@BalochNadir5) March 29, 2026

credit – social media and Twitter

सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीशी त्याची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. “पाकिस्तानची अर्थव्यवस्था जशी कोसळतेय, तसेच त्यांचे नेतेही कोसळत आहेत,” अशा तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः इराण युद्धासारख्या संवेदनशील विषयावर चर्चा सुरू असताना उपपंतप्रधानांचा तोल जाणे, हे राजनैतिक दृष्टिकोनातून ‘अशुभ’ मानले जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pete Hegseth: युद्ध की ‘धर्मयुद्ध’! ‘हे युद्ध येशू ख्रिस्तासाठी…’, US संरक्षण सचिवांच्या विधानावर पेंटागॉनने दिले स्पष्टीकरण

राजनैतिक शिष्टाचार आणि वास्तव

कोणत्याही देशासाठी त्यांचे परराष्ट्र मंत्री हे जगासमोर त्या देशाचा चेहरा असतात. इशाक दार यांच्यासोबत घडलेली ही घटना केवळ एक अपघात असू शकतो, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘वेळ’ महत्त्वाची असते. इराण युद्ध शांत करण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तान किती गंभीर आहे, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या फजितीनंतर पाकिस्तान आपले राजनैतिक वजन पुन्हा कसे सावरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्यासोबत नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या स्वागत समारंभादरम्यान इशाक दार यांचा पाय घसरला आणि ते रेड कार्पेटवर कोसळले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Que: इस्लामाबादमध्ये कोणत्या विषयावर शांतता चर्चा सुरू आहे?

    Ans: इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त, तुर्की आणि सौदी अरेबियामध्ये चर्चा सुरू आहे.

  • Que: या घटनेचा पाकिस्तानच्या प्रतिमेवर काय परिणाम झाला?

    Ans: या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या नेत्यांच्या व्यावसायिक प्रतिमेची खिल्ली उडवली जात असून राजनैतिक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: Pakistan deputy pm ishaq dar falls on red carpet egypt minister iran peace talks 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Egypt
  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • Video Viral
  • World news

संबंधित बातम्या

Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदीला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी अमेरिकेचा ‘इस्लामिक NATO’ डाव?
1

Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदीला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी अमेरिकेचा ‘इस्लामिक NATO’ डाव?

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत
2

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील
3

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
4

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.