Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसवर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. बलुचिस्तानमध्ये हा प्रयत्न झाला असून रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. यापूर्वी देखील जाफर एक्सप्रेसवर अनेक वेळा हल्ले झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 17, 2025 | 11:48 AM
Pakistan's Jaffar Express targeted again in Balochistan

Pakistan's Jaffar Express targeted again in Balochistan

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला
  • रेल्वे ट्रॅकवर मोठा बॉम्बस्फोटाचा प्रयत्न
  • BLA ने घेतली हल्ल्याची जबाबदारी
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या  (Pakistan) जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी रल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. तसेच रॉकेट्सने ट्रेन उडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यापासून जाफर एक्सप्रेस थोडक्यात बचावली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. २०२५ मध्ये जाफर एक्सप्रेसवरील हात आठवा हल्ला आहे, यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Jaffar Express : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला ; बॉम्बस्फोटामुळे रेल्वे रुळावरुन घसरली

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यातून जात होता. यावेळी रेल्वे ट्रॅकवर अचानक मोठा स्फोट झाला. परंतु यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोरांनी शहीद अब्दुल अजीज बुलो परिसरात रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब बसवला होता, परंतु रेल्वे तिथून जाण्यापवूर्वीच हा स्फोट झाला. यामुळे जाफर एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या प्राण थोडक्यात बचावले.

या घटनेची माहिती मिळताच मोठा गोंधळ उडाला होता. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेची सखोल चौकशी करुन बॉम्बस्फोटामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनला रॉकेटने उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही म्हटले जात आहे.

कोणी घेतली हल्ल्याची जबाबदारी? 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुच रिपब्लिकन गार्ड्स (BRG)ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. बलुच राष्ट्रवादी नेते मीर याक बलोच यांनी असे निवेदन माध्यमांना दिले होते.

यापूर्वीचे जाफर एक्सप्रेसवरील हल्ले

जाफर एक्सप्रेसला सतत लक्ष्य केले जात आहे. हा आठवा हल्ला असून यापूर्वी ७ ऑक्टोबर क्वेटा ते पेशावरदरम्यान हे हल्ले घडवण्यात आले होते.  त्यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी सिबी रेल्वे स्थानकाजवळ हल्ला झाला होता, तर त्या आधी ४ ऑगस्ट रोडी कोलपूरजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यांची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) घेतली होती. १८ जून २०२५ रोजी देखील जेकबाबादजवळ रिमोट कंट्रोलने स्फोट घडवून आणला होता.

२९ ऑक्टोबर रोजी देखील नसीराबाद जिल्ह्यातील नोटल भागात जाफर एक्सप्रेसला उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय मार्च २०२५ मध्येही BLA ने जाफर एक्सप्रेस हायजॅक (Jaffar Hijack) केली होती. या हायजॅकमध्ये ४०० प्रवशांना बंधक बनवले होते. बलुच लिबरेशन आर्मीच्या बंदखोरांनी बोलान क्षेत्रातील पीरु, कुनरी आणि गुलदार भागात पटरीवर स्फोटक ठेवून ट्रेन हायजॅक केली होती.जाफर एक्सप्रेस पेशावर ते क्वेटा दरम्यान धावते.

पाकिस्तानाच्या जाफर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ब्लास्ट; रूळावर पलटी, काही तासांपूर्वीच सैनिकांवर झाला होता हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसवर कुठे हल्ला झाला?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेसवर बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यात शहीद अब्दुल अजीज बुलो परिसरात हल्ला करण्यात आला.

  • Que: जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात किती जीवितहानी झाली?

    Ans: जाफर एक्सप्रेसवरील नुकत्याच घडलेल्या हल्ल्यात कोणताही जीवितहानी झालेली नाही.

  • Que: जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली ?

    Ans: तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुच रिपब्लिकन गार्ड्स (BRG)ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

  • Que: जाफर एक्सप्रेसवर किती वेळा हल्ला करण्यात आला?

    Ans: जाफर एक्सप्रेसवर २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत ५ हून अधिक वेळा हल्ले झाले आहेत.

Web Title: Pakistans jaffar express targeted again in balochistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

भौगोलिक अन् सांस्कृतिक बंधांची घट्ट वीण; नवे उच्चायुक्त Dinesh Trivedi ढाक्यात मिटवणार India-Bangladeshमधील अविश्वासाची दरी?
1

भौगोलिक अन् सांस्कृतिक बंधांची घट्ट वीण; नवे उच्चायुक्त Dinesh Trivedi ढाक्यात मिटवणार India-Bangladeshमधील अविश्वासाची दरी?

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
2

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र
3

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र

Masoud Pezeshkian: ‘जगातील मुस्लिमांनी एकत्र यावे,’ इराणच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानला ‘Islamic NATO’ स्थापन करण्याचे केले आवाहन
4

Masoud Pezeshkian: ‘जगातील मुस्लिमांनी एकत्र यावे,’ इराणच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानला ‘Islamic NATO’ स्थापन करण्याचे केले आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.