Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

PM Modi : उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान तमिळ ग्रंथ तिरुक्कुरळचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, तिरुक्कुरळ तेव्हा जितके महत्त्वाचे होते, तितकेच ते आजही महत्त्वाचे आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 31, 2026 | 02:39 PM
Lal Bahadur Shastri Scholarship Uzbekistan

Lal Bahadur Shastri Scholarship Uzbekistan

Follow Us
Follow Us:
  • तिरुक्कुरळ’ ग्रंथाचा गौरव
  • लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्तीची घोषणा
  • सांस्कृतिक आणि भाषा संबंध

उझबेकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ताश्कंद येथे एका विशेष कार्यक्रमादरम्यान प्राचीन तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चे महत्त्व अधोरेखित केले. ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीज येथील महात्मा गांधी केंद्राला भेट दिली असता, पंतप्रधानांनी कवी आणि तत्त्वज्ञान श्रेष्ठ तिरुवल्लुवर यांच्या या अजरामर रचनेचे मुक्तकंठाने कौतुक केले. शतकानुशतकांपासून मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारा ‘तिरुक्कुरळ’ हा ग्रंथ आजच्या आधुनिक काळातही तितकाच प्रासंगिक आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तिरुक्कुरळमध्ये अध्यात्म, जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि व्यावहारिक शहाणपणाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. अभिजात तमिळ साहित्यातील हा उत्कृष्ट नमुना मानवी विचारांची खोली दर्शवतो. ताश्कंद विद्यापीठात हिंदी भाषा शिकवण्यास चालू वर्षी ८० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधत पंतप्रधानांनी विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधकांना या तमिळ महाकाव्याचा उझबेक भाषेमध्ये अनुवाद मोहिमेच्या रूपात करण्याचे आवाहन केले. हा अनुवाद उझबेकिस्तानच्या समृद्ध ज्ञानसाठ्यात मोलाची भर घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Floods: नेपाळमधील त्रिभुवन त्रिशुली शाळेची थरारक कथा; बोधी वृक्षाखाली एकत्र आली मुले अन् डोळ्यांदेखत वाहून गेली शाळा

उझबेक विद्यार्थ्यांसाठी लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती

याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उझबेक विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या अध्ययनासाठी आणि भारतीय संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिक्षणात अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंदमध्ये झालेले निधन आणि त्यांचा त्याग यांचा आदर राखत ही शिष्यवृत्ती दोन्ही देशांतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक बळकट करेल.

#WATCH | Tashkent, Uzbekistan: Prime Minister Narendra Modi says, “The Thirukkural, written in Tamil centuries ago, remains a profound source of inspiration across all walks of life today—encompassing spirituality, philosophy, and practical wisdom. As you celebrate your 80th… https://t.co/82iAbj6Atp pic.twitter.com/rDf0hbuMoM — ANI (@ANI) August 31, 2026

credit – social media and Twitter

पंतप्रधान मोदींनी ताश्कंद येथील शास्त्री स्मारकाला भेट देऊन माजी पंतप्रधानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आणि पुष्पहार अर्पण केला. १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर ताश्कंद करारावर स्वाक्षरी केल्यानंतर शास्त्रीजींचे येथे दुर्दैवी निधन झाले होते, ज्या घटनेला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने भारतीय जनमानसावर घातलेली भुरळ आणि त्यांचे साधे जीवन आजही प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

उझबेक आणि हिंदी भाषेतील ३ हजार समान शब्द

भारत आणि मध्य आशियातील देशांचे सांस्कृतिक नाते ऐतिहासिक काळापासून घट्ट राहिले आहे. या भाषिक नात्याचा दाखला देताना पंतप्रधान म्हणाले की, उझबेक भाषा आणि हिंदी भाषा यांच्यात तब्बल ३,००० हून अधिक शब्द समान आहेत. यामुळे उझबेक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना हिंदी शिकणे अतिशय सोपे आणि नैसर्गिक वाटते. दोन वेगवेगळ्या प्रदेशांतील भाषांमध्ये असलेली ही समानता आपल्या हजारो वर्षांच्या सामायिक वारशाची साक्ष देते.

पंतप्रधान मोदी यांनी ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजचे कौतुक करताना म्हटले की, ही संस्था केवळ विद्यार्थ्यांना पदव्या देण्याचे केंद्र नसून ज्ञानाच्या अथांग सागरात डुंबण्याची आणि नवी क्षितिजे शोधण्याची एक पवित्र जागा आहे. भारतीय भाषा आणि साहित्याचा प्रसार मध्य आशियात करणाऱ्या प्राध्यापकांचे आणि संशोधकांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ‘तिरुक्कुरळ’सारख्या समृद्ध भारतीय साहित्याचा उझबेक भाषेत अनुवाद झाल्यास दोन्ही देशांतील युवा पिढीतील वैचारिक देवाणघेवाण आणखी समृद्ध होईल.

Web Title: Pm modi tashkent visit thirukkural uzbek translation shastri scholarship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Tamil
  • World news

संबंधित बातम्या

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
1

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
2

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
3

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
4

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.