Pakistan Defence minister Khawaja Asif
India Pakistan News in Marathi : नवी दिल्ली/इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) आणि भारताची शत्रूता सध्या सतत चर्चेत येत आहे. पाकिस्तानचे मंत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन भारवर वादग्रस्त विधाने करतायेत. नुकतेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताबद्दर वादग्रस्त विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. स्वत:तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला गेलेला पाक भारताच्या अखंडतेवर टीका करत आहे.
ख्वाजा यांनी एका मुलाखती दरम्यान भारताच्या अखंडतेवर टीका करत, भारत कधीही एकसंघ राष्ट्र नव्हता, केवळ मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळातच भारत एकत्र आला होता असे म्हटले आहे. ख्वाज यांनी औरगजेबाचे कौतुक करत भारताची थट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ख्वाजा यांनी पुढे असेही म्हटले की, भारताकडून त्यांच्या देशाला अजूनही धोका आहे, पण पाकिस्तान त्यासाठी सज्ज आहे.
त्यांनी म्हटले की, पाकिस्तानला युद्ध नको आहे, पण धोका अजूनही टळलेला नाही. यावेळी जर कोणीही त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांचा विजय होईल अशी बढाई मारली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे राष्ट्र हे अल्लाहच्या नावावर स्थापन झालेले आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानच्या लोकांमध्ये मतभेद असले तर भारताविरुद्ध सर्व एकत्र येतात.
ख्वाजा यांच्या विधानावर भारताने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने नुकतेच स्पष्ट केले होते की, पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन दिले, तर भारत यावेळी कोणताही संयम बाळगणार नाही, तर दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात योग्य ती कारवाई करेल.
भारताच्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम (Pahalgam Attack) येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये २६ नागरिकांना त्यांचा धर्म विचारुन ठार करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती. आजही या कारवाईची दहशत पाकिस्तानात आहे.
“Chances of war with India are real and I am not denying that”: Khawaja Asif, PaK Def Min “History shows that India was never one united nation, except briefly under Aurangzeb. Pakistan was created in the name of Allah. At home we argue and compete. In a fight with India we… pic.twitter.com/e1yAxSTSSx — OsintTV 📺 (@OsintTV) October 8, 2025
प्रश्न १. पाकिस्तानचे मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताबद्दल काय व्यक्तव्य केलं?
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताच्या अखंडतेवर टीका करत, भारत कधीही एकसंघ राष्ट्र नव्हता, केवळ मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळातच भारत एकत्र आला होता असे म्हटले आहे.
प्रश्न २. भारताने ख्वाजा यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?
आसिफ ख्वाजा यांच्या विधानावर भारताने चोख प्रत्युत्तर देत स्पष्ट केले होते की, पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन दिले, तर भारत यावेळी कोणताही संयम बाळगणार नाही.
US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल