Washington DC Residents Are Leaving The City before Donald Trump's inauguration
वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी 20 जानेवारी 2025 रोजी देशाचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. सध्या जगभर त्यांच्या शपथविधीची चर्चा सुरु आहे. यापूर्वी त्यांनी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषावले होते. त्यांच्या 2024 चा संपूर्ण निवडणुक प्रचार मोठ्या प्रमाणात वादग्रस्त होता. दरम्यान आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वॉशिंग्टन डीसीमधील परिस्थिती सध्या बिकट असून लोकांनी शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या मीडिया रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन डीसीमधील अनेक रहिवासी शहर सोडण्याचा विचार करत आहेत, कारण त्यांना संभाव्य अशांततेची भीती वाटत आहे. ट्रम्प यांच्या 2016 ते 2020 च्या राजकीय कारकिर्दीपासूनच वाद निर्माण झाले होते. आताही यामुळे अनेक लोकांनी ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीही वॉशिंग्टन डीसीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता काही लोकांनी व्यक्त केली आहे.
2020 चा कॅपिटल हिसांचार
2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या पराभवानंतर 6 जानेवारी 2021 ला कॅपिटलवर झालेल्या हल्ल्याच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. वॉशिंग्टन डीसीमधील ॲलेजांद्रा व्हिटनी-स्मिथ या वकील महिलेने शपथविधीच्या काळात शहराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले की, “निवडणुकीचा निकाल लागल्यावर मी ठरवले होते की, मी इथे राहू शकत नाही.” त्या हिंसक परिस्थितीत त्यांच्या आईने लाइब्रेरी ऑफ काँग्रेसमध्ये काम केले होते, यामुळे त्यांना मोठा ताण जाणवला. त्या म्हणाल्या, “मी पुन्हा त्या प्रकारच्या तणावाच्या जवळही जाऊ इच्छित नाही.”
वॉशिंग्टनमधील टिया बटलर यांसारख्या काही नागरिकांनीही शपथविधीच्या काळात शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कॅलिफोर्नियामध्ये आठवडाभर जाण्याची योजना आखत आहेत. त्यांनी 6 जानेवारीच्या दंगलींच्या आणि 2020 च्या निवडणुकीनंतर झालेल्या अशांततेच्या आठवणींमुळे अस्वस्थता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आपल्या देशाचे नेतृत्व एका गुन्हेगाराच्या हाती सोपवण्यासारखे वाटते.” या सगळ्या गोष्टींमुळे काही लोक वॉशिंग्टन डीसी सोडून शांत आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा विचार करत आहेत.
ट्रम्प समर्थकांमध्ये उत्साह
दुसरीकडे, ट्रम्प समर्थक शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे. ट्रम्प यांच्या औपचारिक शपथविधी समारंभात मैफिली, उत्सव परेड यासह अनेक औपचारिक कार्यक्रम होणार आहेत. ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. अधिकृत शपथविधी सोहळा 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता) होईल. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पदाची शपथ देणार आहेत.