Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pete Hegseth: युद्ध की ‘धर्मयुद्ध’! ‘हे युद्ध येशू ख्रिस्तासाठी…’, US संरक्षण सचिवांच्या विधानावर पेंटागॉनने दिले स्पष्टीकरण

US-Iran War:अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराण युद्धाला 'येशू ख्रिस्तासाठीचे युद्ध' संबोधून एक नवीन वाद निर्माण केला आहे. पेंटागॉनमधील प्रार्थना सभा आणि धार्मिक विधानांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 30, 2026 | 01:21 PM
pete hegseth controversy jesus christ iran war pentagon prayer meetings 2026

pete hegseth controversy jesus christ iran war pentagon prayer meetings 2026

Follow Us
Follow Us:
  • संरक्षण सचिवांचे ‘ख्रिस्ती’ कार्ड
  • पेंटागॉनमध्ये ‘प्रार्थना सभा’
  • पद वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न? 

Pete Hegseth Jesus Christ War Statement  : इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष (US-Israel Iran War) आता केवळ क्षेपणास्त्रे आणि विमानांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. या युद्धाला आता चक्क धार्मिक वळण मिळाले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव (Secretary of Defense) पीट हेगसेथ यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाने व्हाईट हाऊसपासून ते पेंटागॉनपर्यंत सर्वांचे धाबे दणाणले आहेत. हेगसेथ यांनी इराणविरुद्धच्या कारवाईला ‘येशू ख्रिस्तासाठीचे युद्ध’ म्हटले असून, दुष्ट लोकांशी लढताना दया दाखवू नका, असे आदेशही दिले आहेत.

पेंटागॉनमध्ये ‘प्रार्थना सभा’ आणि छुप्या बैठका

‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका धक्कादायक वृत्तानुसार, पीट हेगसेथ यांनी गेल्या काही दिवसांत पेंटागॉनमध्ये किमान १० बैठका घेतल्या आहेत. या बैठकांना त्यांनी अधिकृतरीत्या ‘प्रार्थना सभा’ असे नाव दिले आहे. या सभांमध्ये त्यांनी धार्मिक नेत्यांशी चर्चा केली आणि इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईला धर्माच्या संरक्षणाचा एक प्रयत्न म्हणून सादर केले. “जर आपण दुष्टांविरुद्ध शस्त्र उचलत असू, तर तिथे दयेला स्थान नसावे,” असे विधान त्यांनी धार्मिक नेत्यांसमोर केले. त्यांच्या या कृतीमुळे अमेरिकन सैन्य दलात ‘ख्रिश्चन शिपायांची’ फौज तयार केली जात असल्याचा आरोप माजी सैनिकांनी केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Holy Sepulchre: जेरुसलेममध्ये धार्मिक युद्ध? अल-अक्सा नंतर आता ‘चर्च’वरही निर्बंध; ख्रिस्ती जगतात संताप अन् नेतन्याहू बॅकफूटवर

पेंटागॉनची सारवासारव आणि तज्ज्ञांचा इशारा

हेगसेथ यांच्या या विधानामुळे वातावरण तापल्याचे पाहून पेंटागॉनने तात्काळ एक स्पष्टीकरण जारी केले आहे. संरक्षण विभागाने म्हटले आहे की, या प्रार्थना सभा पूर्णपणे ऐच्छिक होत्या आणि त्यातून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. मात्र, अभ्यासकांचे मत यापेक्षा वेगळे आहे. जॉर्जटाऊन विद्यापीठाचे मॅथ्यू टेलर यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेंटागॉनने युद्धाला अधिकृतरीत्या ‘धर्मयुद्धा’चे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे, जो अत्यंत धोकादायक आहे.

Secretary of War Pete Hegseth recited a prayer for US troops attacking Iran, asking for strength and protection, during a Pentagon briefing. American and Israeli officials have been criticised for pushing rhetoric suggesting that the campaign against Iran is a religious war. pic.twitter.com/JNZnZZ1yQy — Al Jazeera English (@AJEnglish) March 10, 2026

credit – social media and Twitter

ख्रिश्चन सैनिकांचा आकडा आणि वास्तव

असोसिएटेड प्रेसच्या एका अहवालानुसार, अमेरिकन लष्करातील सर्वच सैनिक हे ख्रिश्चन नाहीत. केवळ ७० टक्के सैनिक स्वतःला ख्रिश्चन मानतात, तर उरलेले २५ टक्के इतर धर्मीय किंवा अज्ञात प्रवर्गातील आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण सचिवांनी युद्धाला एका विशिष्ट धर्माशी जोडल्यामुळे लष्करामध्ये अंतर्गत फूट पडण्याची भीती निर्माण झाली आहे. माजी सैनिकांनी या प्रक्रियेचा निषेध करत म्हटले आहे की, सैन्याला धर्माच्या चष्म्यातून पाहणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Border: नेपाळमध्ये सत्तांतर होताच भारतीय सीमेवर हालचालींना वेग; बालेन शाह सरकारचा मोठा ‘बॉर्डर प्लॅन’, वाचा सविस्तर

का करत आहेत हेगसेथ असे विधान?

राजकीय विश्लेषकांच्या मते, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच इराण युद्धाचे खापर पीट हेगसेथ यांच्यावर फोडले आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, हेगसेथ यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिका इराणमध्ये अडकली आहे. आता आपले पद वाचवण्यासाठी आणि उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन समर्थकांना खूश करण्यासाठी हेगसेथ यांनी हा ‘धर्मयुद्धा’चा डाव टाकला असल्याची चर्चा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीट हेगसेथ यांनी इराण युद्धाबद्दल काय म्हटले?

    Ans: पीट हेगसेथ यांनी इराण युद्धाचे वर्णन "येशू ख्रिस्तासाठी लढले जाणारे युद्ध" असे केले असून दुष्टांवर दया न दाखवण्याचे आवाहन केले आहे.

  • Que: पेंटागॉनने या वादावर काय स्पष्टीकरण दिले?

    Ans: पेंटागॉनने म्हटले आहे की प्रार्थना सभा ऐच्छिक होत्या आणि त्यातून कोणत्याही लष्करी शिष्टाचाराचा भंग झालेला नाही.

  • Que: हेगसेथ यांच्यावर कोणते आरोप होत आहेत?

    Ans: हेगसेथ स्वतःचे पद वाचवण्यासाठी युद्धाला धार्मिक वळण देत असून अमेरिकन सैन्याचे 'ख्रिश्चन सैन्यात' रूपांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Pete hegseth controversy jesus christ iran war pentagon prayer meetings 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.