Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

G-7 Summit साठी पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट, ट्रम्प भेटीचीही शक्यता

PM Modi France Visit For G-7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांच्या युरोपीय दौऱ्यावर जाणार आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी हा त्यांचा दौरा होत असून ते युरोपीय राष्ट्र स्लोव्हाकियाला देखील भेट देणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 03:44 PM
PM Modi To attend G7 Summit

PM Modi To attend G7 Summit

Follow Us
Follow Us:
  • G-7 Summit साठी पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा
  • फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट
  • ट्रम्प भेटीचीही शक्यता
PM Modi France Visit For G-7 : पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जून २०२६ मध्ये १३ ते १८ जून दरम्यान युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते १६ आणि १७ जून रोजी फ्रान्समध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्य इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार असून भारत फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर यावेळी सविस्तर चर्चा होईल. तसेच पंतप्रधान मोदी युरोपीय राष्ट्र स्लोव्हाकियालाही भेट देणार आहेत.

हे देखील वाचा : Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा

फ्रान्स दौऱ्याची सुरुवात

पंतप्रधान मोदी १३ जून रोजी फ्रान्स दौऱ्याची सुरुवात करणार आहे. सुरुवातीला नीस शहराला भेट देतील. यानंतर ते फ्रान्सचे राष्ट्राध्य इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्याशी १४ जून रोजी द्विपक्षीय चर्चा करणार आहे. तसेच मॅक्रॉन यांच्यासह भारत इनोवेट्स कार्यक्रमाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. या कार्यक्रमाअंतर्गत स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटलसवर भर दिला जाणार आहे.

स्लोव्हाकियाचा ऐतिहासिक दौरा

यानंतर पंतप्रधान मोदी १४ ते १६ जून दरम्यान स्लोव्हाकियाच्या राजकीय दौऱ्यावर असणार आहेत. १९९३ मध्ये स्लोव्हाकियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली होती. त्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. पंतप्रधान मोदी तिथे स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल्स आणि रेल्वे उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होणार आहे.

G-7 परिषदेत सहभागी होणार

या दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे १६-१७ जून रोजी फ्रान्सच्या एव्हियन येथे होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. या परिषदेत कृत्रीम बुद्धिमत्तेचा सुरक्षित विस्तार, जागतिक एकता आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी नवी भागीदारीवर चर्चा होणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

भारताच्या जागतिक भूमिकेला बळ

पंतप्रधान मोदींचा G-7 परिषदेत सहभाग हा ग्लोबल साऊथच्या विकसनशील देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इंडिया इनोव्हेट्स आणि विव्हाटेक सारख्या कार्यक्रमात भारतीच उपस्थिती राष्ट्राला डिजिटल परिवर्तनाचे केंद्र म्हणून सादर करत आहे. यामुळे संपूर्ण युरोपियन युनियनसोबतच्या भारताच्या सर्वसमावेश भागीदारीला मजबूती मिळेल.

हे देखील वाचा : US citizenship revocation : भारतीय प्रवाशाला अमेरिकेत मोठा झटका; नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Web Title: Pm modi europe tour for g7 summit to meet french president macron trump meeting likely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • France
  • G-7 summit
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
1

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
2

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
3

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
4

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.