US citizenship revocation : भारतीय प्रवाशाला अमेरिकेत मोठा झटका; नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं प्रकरण काय?
अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात न्यू जर्सीतील प्लेसमेंट कंपनी मॅग्नाव्हिजन एलएलसीचे मालक नीरज शर्मा यांचा सामावेश आहे. नारीज शर्मा यांनी ११ बनावट एच-१बी व्हिसा (H-1B Visa) अर्जांवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. संबंधित उमेदवार जागतिक आर्थिक संस्थांमध्ये काम करणारा असल्याचा दावा करण्यात आला होता. माहितीनुसार, एच-१बी व्हिसा अर्जांसाठी आधारभूत कापत्रे म्हणून शर्मा यांनी सादर केलेल्या पत्रांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आढळल्या.
नीरज शर्मा यांनी २०१७ मध्ये अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्याना डिसेंबरमध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते. पण नागरिकत्व मिळण्यापूर्वी त्यांच्यावर व्हिसाचा गैरवापर आणि फसवणुकीच्या प्रकरणाता त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे आरोप त्यांनी मुलाखतीदरम्यान लपवले असल्याचे न्याय विभागाने म्हटले.
दरम्यान अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाचे प्रमुख मार्कवेन यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, अमेरिकेचे नागरिकत्व हा एक विशेषाधिकार असून कायदा मोडणाऱ्या किंवा नागरिकत्व मिळवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि नागरिकत्व कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीने महत्त्वाची माहिती लपवली किंवा चुकीची माहिती देऊन नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते रद्द केले जाते. शिवाय कोणत्याही गंभीर गुन्ह्यांमध्ये व्यक्तीचा समावेश असले तर नागरिकत्व मिळणे कठीण असते.
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इमिग्रेशन आणि नागरिकत्व धोरणात कडक बदल केले आहे. अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतिरतांना रोखणे आणि सीमा सुरक्षेसाठी तपासणी अत्यंत कडक करण्यात आली आहे. आतापर्यंत अवैधपणे अमेरिकेत राहणाऱ्या लाखो लोकांना डिपोर्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेने एका भारतीयसह आणखी १७ जणांचे नागरिकत्व रद्द करण्यास सुरुवात केली आहे. या १७ जणांवर बाल लैंगिक अत्याचार, अश्लील साहित्य बाळगणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.






