
PM Modi Foreign Visit
संयुक्त अरब अमिराती : सुरुवातीला १५ मे रोजी पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिराती(UAE) ला भेट देतील. यावेळी ते यूएईचे राष्ट्रध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतील. या भेटीत उर्जा सुरक्षा आणि भारतीय समुदायाच्या हिंतावर चर्चा केली जाणार आहे.
नेदरलँडस : यानंतर पंतप्रधान नेदरलँड्समध्ये किंग विलेम-अलेक्झांडर आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटेन यांची भेट घेणार आहे. या भेटीत सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि पाणी व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक विषयांवर संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार आहे. १५ ते १७ मे पर्यंत हा दौरा असेल.
स्वीडन : यांनतर १७ मे रोजी ते स्वीडना रवाना होतील. येथे स्वीडनच्या गोथेनबर्ग येथे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांची पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत. या भेटीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुरवठा साखळी मजहूत करण्यावर द्विपक्षीय चर्चा होईल. तसेच युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री लाही पंतप्रधान संबोधित करतील. भारत आणि युरोपमधील व्यापार वाढवणे याचा हेतू आहे.
नॉर्वे : यांनतर १८ मे रोजी पंतप्रधान नॉर्वेला भेट देतील. या ठिकाणी ओस्लो येथे होणाऱ्या तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या परिषदेत डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, स्वीडन, नॉर्वेचे नेतांच्या सहभाग असेल. या परिषदेत रिन्यूएबल एनर्जी आणि स्पेस रिसर्चवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
इटली : या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी इटलीला भेट देतील. येथे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर चर्चा पंतप्रधान मोदी करतील.