Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi In QUAD: दबाव टाकू नका, मी येतोय! मोदींच्या एका वाक्याने बायडेनही झाले होते चकित; क्वाड स्थापनेचा थरार आता झाला उघड

India US QUAD News : अमेरिकेचे माजी उप परराष्ट्र सचिव कर्ट कॅम्पबेल यांनी खुलासा केला आहे की, 'क्वाड' गटामागे भारत हीच मुख्य प्रेरक शक्ती आहे आणि पंतप्रधान मोदींनी पडद्याआडून या आघाडीचे नेतृत्व केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2026 | 02:02 PM
pm modi joe biden quad inside story kurt campbell disclosure 2026

pm modi joe biden quad inside story kurt campbell disclosure 2026

Follow Us
Follow Us:
  • भारताचे छुपे नेतृत्व
  • बायडेन-मोदी वाटाघाटींचा किस्सा
  • भारत-अमेरिका संबंधांतील वळण

Kurt Campbell QUAD India disclosure : आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे वजन किती वाढले आहे, याची साक्ष देणारा एक मोठा खुलासा अमेरिकेतून झाला आहे. अमेरिकेचे माजी उप परराष्ट्र सचिव कर्ट एम. कॅम्पबेल यांनी हडसन इन्स्टिट्यूटमधील एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले की, ‘क्वाड’ (QUAD) या भारत (India), अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या समावेश असलेल्या शक्तिशाली गटाचे अस्तित्व भारताशिवाय शक्यच नव्हते. या गटाला केवळ भारताने साथ दिली नाही, तर भारतानेच याचे पडद्यामागून नेतृत्व केले आहे.

पंतप्रधान मोदींना मनवण्यासाठी बायडेन यांची धडपड

कॅम्पबेल यांनी एका अतिशय रंजक प्रसंगाचा उल्लेख केला. जेव्हा क्वाडची पहिली नेते-स्तरीय बैठक आयोजित करायची होती, तेव्हा पंतप्रधान मोदी काहीसे साशंक होते. त्यांना या गटात सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः पुढाकार घेतला. बायडेन यांनी मोदींशी तासाभराहून अधिक वेळ फोनवर चर्चा केली आणि त्यांच्यावर इतका “प्रेमळ दबाव” टाकला की अखेर मोदींना हसून दाद द्यावी लागली. मोदी म्हणाले, “मी येण्याचे वचन देतो, फक्त आता माझ्यावर दबाव टाकू नका!” या एका वाक्याने जागतिक राजकारणात भारताचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Embassy: ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet

चीनविरुद्ध अमेरिकेची भारताला गुप्त साथ

या खुलाशामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात जेव्हा भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव वाढला होता, तेव्हा अमेरिकेने भारताला अत्यंत संवेदनशील गुप्त माहिती (Intelligence) पुरवली होती. चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेने भारताला दिलेली ही सामरिक मदत दोन्ही देशांमधील वाढत्या विश्वासाचे प्रतीक मानली जाते. भारताच्या याच सक्रिय सहभागामुळे आज क्वाड ही आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठी शक्ती बनली आहे.

#WATCH | Washington DC, USA: Former United States Deputy Secretary of State Kurt M. Campbell says, “…When we started the educational initiative as part of the Quad, we immediately recruited money from the technology and other communities that Elizabeth described. We were able… pic.twitter.com/0czKXBuNU2 — ANI (@ANI) April 23, 2026

credit – social media and Twitter

परस्पर आदराची गरज आणि बदलतं राजकारण

कॅम्पबेल यांनी भारत-अमेरिका संबंधांच्या सद्यस्थितीबद्दल थोडे चिंताजनक मतही व्यक्त केले. ते म्हणाले की, दोन मोठ्या लोकशाही देशांमधील संबंध हे ‘परस्पर आदराच्या’ तत्त्वावर आधारलेले असावेत. कधीकधी आपल्याला या मूलभूत तत्त्वाची आठवण करून द्यावी लागते, ही खेदाची बाब आहे. सध्याच्या काळात जेव्हा ट्रम्प क्वाडपासून थोडे दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे, तेव्हा भारताचे या गटातील महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. भारताशिवाय हा गट केवळ नावालाच उरला असता, असे कॅम्पबेल यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Anti India : हाच का तो मोदींचा ‘खरा मित्र’? भारताला ‘नरक’ म्हणणं ट्रम्पला पडलं महागात; अमेरिकन खासदारांनी पण काढली इज्जत

भारताची वाढती ताकद

आज भारत केवळ एक सदस्य म्हणून नव्हे, तर ‘प्रादेशिक स्थैर्याचा केंद्रबिंदू’ म्हणून क्वाडकडे पाहतो. भारताच्या पुढाकारानेच आज सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर क्वाड देश एकत्र काम करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा वाढता प्रभाव येणाऱ्या काळात जागतिक सत्तासंतुलन बदलण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'क्वाड' (QUAD) म्हणजे काय आणि त्यात कोणते देश आहेत?

    Ans: क्वाड ही भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची धोरणात्मक आघाडी आहे, जी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्याचे काम करते.

  • Que: कर्ट कॅम्पबेल यांनी मोदी आणि बायडेन यांच्याबद्दल काय खुलासा केला?

    Ans: कॅम्पबेल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींना पहिल्या क्वाड बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जो बायडेन यांनी तासाभराहून अधिक काळ फोनवर मनवले होते.

  • Que: भारत-चीन तणावावेळी अमेरिकेने भारताला कशी मदत केली?

    Ans: अमेरिकेने भारताला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) चीनच्या लष्करी हालचालींची अत्यंत गुप्त आणि सामरिक माहिती पुरवून भारताची बाजू मजबूत केली होती.

Web Title: Pm modi joe biden quad inside story kurt campbell disclosure 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • America
  • PM Narendra Modi
  • World news

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
3

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
4

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.