PM Modi speaks Iran's president after US Strike On Iran
Israel Iran War News Marathi : नवी दिल्ली : सध्या मध्य पूर्वेत गेल्या १० दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. याच दरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेन सैन्याने इराणच्या नतान्झ, फोर्डो, आणि इस्फाहन या केंद्रावर हल्ला केला आहे. यामुळे इराणध्ये संतापाचे वातावरण आहे. इराणने संताप व्यक्त करत इस्रायलवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
याच संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या अध्यक्षांशी संपर्क साधला. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. याची माहिती पंतप्रधाने मोदींनी एक्सवरुन एका पोस्टद्वारे दिली.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत इराणच्या अध्यक्षांशी संवाद साधल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी मी फोनवरुन संवाद साधला. आम्ही मध्य पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. अलिकडीच्या संघर्ष वाढीवर चिंता व्यक्क केवी, तणाव कमी करण्यासाठी संवाद साधण्याचा आणि पुढे जाण्यासाठी राजनैतिक कुटनीतिचे आवाहन मी पेझेश्किया यांना केले. तसेच प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य पुन्हा पुनर्संचयित करण्याची मागणी केली.
Spoke with President of Iran @drpezeshkian. We discussed in detail about the current situation. Expressed deep concern at the recent escalations. Reiterated our call for immediate de-escalation, dialogue and diplomacy as the way forward and for early restoration of regional…
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2025
ही चर्चा अशा वेळी झाली जेव्हा अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला केला. रविवारी २२ जून रोजी पहाटे अमेरिकन सैन्याने हा हल्ला केला. ट्रम्प यांनी इस्रायलवरी हल्ले थांबवण्याचा स्पष्ट इशारा इराणला दिला आहे,. नाहीतर हल्ले असेच सुरु राहतील असे म्हटले आहे.
अमेरिकेने इराणवर हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स मिसूरी येथील व्हाईटमन एअर बेसवर पोहोचलेय त्यानंतर या विमानाने इराणच्या दिशेने उड्डाण केले. यानंतर ही विमाने गुआम तळाजवळ दिसली. बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स ३०,००० पौंड वजनाचा बंकर बस्टर बॉम्ब, ऑर्डनन्स पेनेट्रेटर वाहून नेण्यास सक्षम आहेत. बी-२ बॉम्बर्स इराणमधील अणुस्थळांवर हल्ला करण्यास सक्षम मानले जातात.