US Strike On Iran : 'याचे दूरगामी परिणा भोगावे लागतील' ; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची तीव्र प्रतिक्रिया (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Strike On Iran News Marathi : तेहरान : अमेरिकेने रविवारी (२२ जून) सकाळी इराणच्या अणुप्रकल्पांवर तीव्र हल्ले केले आहे. या हल्ल्यात इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो या तीन अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याने इराण हादरला आहे. इराणने देखील संत्पत होत इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर म्हटले आहे. तसेच प्रत्युत्तराचेही संकेत दिले आहे. या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल असे म्हटले आहे.
सोशल मीडिया एक्सवर त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेचे इराणच्या शांततापूर्ण अणुकार्यक्रमांवर हल्ला केला आहे. अमेरिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे. या परिस्थिती अमेरिकेने इराणवर केलेला हा हल्ला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतो असे म्हटले आहे. इराण आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करेल, अमेरिकेला लवकरच याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील.”
अराघची यांनी हेही म्हटले की, इराणमध्ये या हल्ल्याचा परिणाम अधिक काळ राहिल. संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी या धोकादायक आणि अस्थिरता पसरवण्याच्या गुन्हेगारी वर्तनावर योग्य ती कारवाई करावी असे म्हटले आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर आणि कायदेशी स्व-संरक्षण कायद्यांतर्गत इराणला त्याच्या सार्वभौमत्वाचे, हितसंबंधाते आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी तयार आहे.
“In accordance with the UN Charter and its provisions allowing a legitimate response in self-defense, Iran reserves all options to defend its sovereignty, interest, and people,” Iran’s foreign minister said in first official reaction to US attacks.
“The United States, a… pic.twitter.com/D63L18PKSq
— Iran International English (@IranIntl_En) June 22, 2025
दरम्यान इराणच्या अणुउर्जा संघटनेने (AEOI) ने अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. संस्थेने आंतरराष्ट्रीय अणुउर्जा एजन्सी (IAEA)च्या मौनावरही प्रश्न उपस्थित केले आहे. AEOI ने, IAEA च्या मौनावर अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांचाही हात असल्याचे दर्शवते असे म्हटले आहे. तसेच अमेरिकेच्या हल्ल्यांना न जुमाननता, शास्त्रज्ञ आणि तज्ञ इराणच्या अणुप्रकल्पांवर काम करत राहतील असेही AEOI ने म्हटले आहे.
अमेरिकेने इराणच्या नतान्झ, फोर्डो आणि इस्फाहन या अणु केंद्रावर बॉम्ब हल्ला केला आहे. यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमांचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायल करत आहे. पंरुत इराणने या हल्ल्यात त्यांचे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे.