
PM Modi to attend G20 summit on November 21-23 in South Africa
यंदाची G-20 परिषद भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. २०२३ मध्ये भारताने या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होचे. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान मोदी या परिषदेसाठी उपस्थित राहार आहे. ही परिषद भारतासाठी महत्त्वाची आहे कारण, भारताने आतापर्यंत नेहमी ग्लोबल साऊसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला आहे. भारताच्या सहकार्यानेच दक्षिण आफ्रिकेला या परिषदेचे सदस्यत्व मिळाले होते. पंतप्रधान मोदी यांची परिषदेला उपस्थिती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावणारी आणि एक राजनैतिक आदर्श ठरणार आहे.
याच वेळी दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासही नकार दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर गोऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप केला आहे.
ट्रम्प यांच्या मते, दक्षिण आफ्रिकेत डच, फ्रेंच आणि जर्मन वंशाचे लोक हिंसाचाराला बळी ठरत आहेत. या लोकांच्या शेती आणि जमीन जबरदस्तीने ताब्यात घेतल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे ट्रम्प यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणाऱ्या देशात G-20 परिषदेच्या आयोजनाला लज्जास्पद म्हणून संबोधले आहे.
अशा परिस्थितीत भारताची राजकीय उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे ग्लोबल साउथमध्ये भारताच्या भूमिकेला मान मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ट्रम्प यांचे आरोप फेटाळले आहेत.
या परिषदेत जगाच्या शाश्वत विकासावर, जागतिक प्रशासनांमध्ये सुधार करण्यावर, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हानावर , आर्थिक संकट, डिजिटल विकासावर, उर्जा संक्रमणावर, स्टार्टअप्सवर, चर्चा केली आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अमेरिकेच्या बहिष्कारानंतरही मोदी या परिषदेला जात आहे. यामुळे परिषदेत मोदींची काय भूमिका असेल याकडे सर्वजण बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा! G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप