PM Modi to soon leave for UK and Maldives tour
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहे. २३ जुलै ते २६ जुलै पर्यंत हा दौरा असेल. पंतप्रधान मोदी या दरम्यान प्रथम ब्रिटनला २३ जुलै रोजी पोहोचतील. यादरम्यान ब्रिटनमध्ये पंतप्रधान मोदी असे द्विपक्षीय कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २४ जुलै रोजी पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान सर केयर स्टारमर यांची भेट घेणार आहे.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारावर चर्चा करतील. तसेच याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये FTA कराराची घोषमा केली जाईल. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाला लक्षात घेता, हा करार दोन्ही देशांच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान मोदींचा हा चौथा ब्रिटन दौरा आहे. या भेटीदरम्यान भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर सविस्तर चर्चा होईल. दोन्ही नेते प्रादेशिक आणि जागितक मुद्द्यांवरही देवाण-घेवाण करणार आहे. यामध्ये विशेष करुन रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या भेटीदरम्यान दोन्ही देशातील व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष संरक्षण आणि सुरक्षा, हवामान, आरोग्यस, शिक्षण आणि नागरिकांच्या संबंधांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशातील धोरणात्मक प्रगतीचा आढावाही घेतला जाईल. याशिवाय पंतप्रदान मोदी ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांची देखील भेट घेण्याची शक्यत आहे.
यानंतर दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी मालदीवला जाणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी मालदीवचे अध्यक्ष डॉ. अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांची भेट घेतील. त्यांच्याच निमंत्रमावरुन पंतप्रधान मोदींचा हा मालदीव दौरा होत आहे. मालदीवचा हा पंतप्रधान मोदींचा तिसरा दौरा असेल. तर अध्यक्ष डॉ. अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या कार्यकाळातील हा पहिला दौरा असले. या दरम्यान पंतप्रधान मोदी मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्य समारंभारत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या दरम्यान, पंतप्रधान मोदी अध्यक्ष मुइझ्झू यांच्याशी परस्पर हितसंबंधावर चर्चा करतील. तसेच२०२४ ऑक्टोबर मध्ये मालदीवच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा झाला होता. यावेळी व्यापर आर्थिक आणि सागरी सुरक्षेसाठी भारत आणि मालदीवमध्ये करार करण्यात आला होता. या कराराचा देखील आढावा या दौऱ्यातघेतला जाईल. यातून भारत आणि मालदीवच्या सागरी संबंधांच महत्त्व दिसून येते. या धोरणाला नेबरहूड फर्स्ट म्हणून संबोधले जाते. हा दौरा दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.