Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

PM Modi 25 Years : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल देशवासियांना संबोधित केले. 'वूई विल डू इट... आपण करूनच दाखवू' हा नवा नारा देत त्यांनी विकसित भारताचा संकल्प केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 07, 2026 | 12:47 PM
PM Modi 25 years in governance Narendra Modi Chief Minister to Prime Minister

PM Modi 25 years in governance Narendra Modi Chief Minister to Prime Minister

Follow Us
Follow Us:
  • २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
  • ‘वूई विल डू इट’ नवा नारा
  • जनता आणि संविधानाप्रती कृतज्ञता

भारतीय राजकारणात आणि सार्वजनिक प्रशासनात एक नवा इतिहास रचत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून २५ (PM Modi 25 Years) वर्षांचा प्रदीर्घ आणि यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. या विशेष टप्प्यावर त्यांनी संपूर्ण देशवासीयांना संबोधित करताना अत्यंत भावूक आणि तितकाच प्रेरणादायी संवाद साधला. आपल्या २५ वर्षांच्या प्रशासकीय प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू!’ हा नवा नारा देत विकसित भारताच्या निर्मितीसाठी १४० कोटी भारतीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर ते आज देशाचे पंतप्रधान म्हणून निरंतर जनसेवा करत आहेत. हा संपूर्ण प्रवास म्हणजे जनतेचा आशीर्वाद आणि संविधानाची ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘वूई विल डू इट’ चा नवा नारा आणि विकसित भारताचा दृढ संकल्प

आपल्या संबोधनामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील विविध वळणांचे स्मरण केले. ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, ज्यांनी विरोध केला, ज्यांनी विजय मिळवून दिला आणि ज्यांनी अपयशाची चव चाखवली या सर्वांचे आभार मानत त्यांनी लोकशाहीच्या विविध घटकांचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, ज्यांनी मला जिंकवले त्यांनी मला विनम्रता शिकवली आणि ज्यांनी पाडले त्यांनी मला पुन्हा जिद्दीने उभे राहायला शिकवले. टीकाकारांमुळे मला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळाली, तर समर्थकांमुळे विश्वासाची प्रचंड ताकद अनुभवता आली. विरोधकांनी मला लोकशाहीची खरी शक्ती समजावून सांगितली. प्रत्येक संकटाने माझ्या धैर्याची परीक्षा घेतली, तर प्रत्येक यशाने मला एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peaceful Communication: संघर्षाच्या काळात ‘संवाद’ कसा ठरू शकतो शांततेचा सर्वात मोठा मार्ग? जाणून घ्या सविस्तर

अनुभवातून शिकले धडे: भुजच्या भूकंपापासून ते चंद्रयान आणि कोरोनापर्यंतचा प्रवास

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की त्यांच्या आयुष्यातील एकही घटना वाया गेलेली नाही; प्रत्येक प्रसंगाने त्यांना काही ना काही नवे शिकवले आहे. २००१ मधील भुजच्या विनाशकारी भूकंपाचे स्मरण करताना ते म्हणाले की, या आपत्तीने आपल्याला पुन्हा शून्यातून उभे राहण्याची आणि पुनर्निर्माणाची ताकद दिली. अंतराळ क्षेत्रातील चंद्रयान अभियानातील सुरुवातीच्या अडचणींनी अपयशातून धडा घेऊन अधिक उंच उड्डाण कसे करायचे हे दाखवून दिले. तर जागतिक महामारी कोरोनाच्या काळात देशाने दाखवलेल्या धैर्याने राष्ट्राच्या सामूहिक चेतनेचे आणि एकजुटीचे महत्त्व पटवून दिले.

#WATCH | PM Narendra Modi offers prayers at Sri Vinayaka Mandir in Delhi The PM has completed 25 years in public life today. (Video source: DD) https://t.co/voCCtYx2Oe — ANI (@ANI) October 7, 2026

credit – social media and Twitter

माध्यमांनी दिलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांतून पुढे जाण्याचे कौशल्य शिकवले, तर देशातील अत्यंत सामान्य आणि गरीब नागरिकांनी आपल्याला मर्यादित साधनांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी दृढ निर्धार करण्याची प्रेरणा दिली, असे त्यांनी नमूद केले. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताना २५ वर्षांनंतर असा सुवर्णकाळ पाहायला मिळेल याची कल्पनाही केली नव्हती, असे सांगताना त्यांनी भाजप, एनडीए आणि लोकशाहीवर निष्ठा ठेवणाऱ्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार

जनता हेच ईश्वर आणि अनुभव हीच देशाची संपत्ती

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी संविधानाला सर्वोच्च स्थान देत नमन केले. देशवासीयांची अधिक ताकदीने आणि ऊर्जेने सेवा करता यावी यासाठी त्यांनी मंदिरात जाऊन ईश्वरचरणी प्रार्थना केल्याचे सांगितले. १४० कोटी देशवासीयांची सेवा करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, हीच माझी एकमेव मागणी आहे. देशातील प्रत्येक नागरिक हा माझ्यासाठी ईश्वराचे रूप आहे आणि जनतेचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी शक्ती राहिली आहे, असे विचार त्यांनी मांडले.

गेल्या २५ वर्षांत कमावलेला प्रशासकीय आणि राजकीय अनुभव ही केवळ माझी व्यक्तिगत मालमत्ता नसून ती संपूर्ण देशाची संपत्ती आहे, असा पुनरुच्चार मोदींनी केला. या संपत्तीवर देशातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आपण जे काम हाती घेतले आहे ते पूर्ण करणारच असा दृढ विश्वास व्यक्त करत त्यांनी ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू!’ च्या घोषणा देत देशातील जनतेमध्ये नव्या ऊर्जेचा आणि संकल्पाचा संचार केला.

Web Title: Pm narendra modi completes 25 years in governance we will do it slogan hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • BJP
  • Modi 3.O
  • PM Modi news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार
1

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार
2

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
3

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
4

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.