Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Ulhasnagar Political News: उल्हासनगरमध्ये महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे कमलेश निकम आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 02:13 PM
भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगरमध्ये महायुतीतील वाद पोलीस ठाण्यात
  • शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांवर परस्पर गुन्हे
  • रवींद्र चव्हाणांबाबत आक्षेपार्ह विधान भोवले
Ulhasnagar Political News: सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील राजकीय वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. परस्पर आरोप-प्रत्यारोपांनंतर दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल झाल्याने उल्हासनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.(Ulhasnagar Political News)

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून शिवसेना पदाधिकारी आणि महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र चव्हाण यांची बदनामी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

भाजप पदाधिकारी दीपा पंजाबी यांच्या उल्हासनगरमधील कार्यालयासमोर गोंधळ घातल्याच्या आरोपावरूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात कमलेश निकम यांच्यासह गुड्डू राय, निलेश बोबडे, सुरेश सिंग, मोहित पेशवानी, ब्रिज बिहारी शुक्ला, सुंदर मुरलीधर, संतोष राय, अमन राय, गणेश श्रीवास्तव, सुरज सिंग, शुभम गोसावी, अविनाश विरारे, नरेश साळवे, मॅडीस स्टालिन, कमल यादव, विशाल हजारे, गणेश हजारे, प्रफुल्ल जाधव, करण भोईर यांच्यासह इतर व्यक्तींची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वाधवा आर्या यांनी केलेल्या तक्रारीतही कमलेश निकम यांचे नाव असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, शिवसेना पदाधिकारी कमलेश निकम यांनीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीवरून उल्हासनगर क्रमांक 1 पोलीस ठाण्यात भाजपच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकम यांना धमकी देणे आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजप पदाधिकारी मनीष हिंगोली, कपिल अडसूळ, अविनाश पंजाबी, गौरव भालेराव, राकेश पाठक आणि प्रदीप रामचंदानी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकाच सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांत धाव घेतल्याने उल्हासनगरमधील भाजप-शिवसेना संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे. आता या परस्पर तक्रारींच्या तपासात पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा

Web Title: Ulhasnagar bjp shiv sena shinde group dispute police cases ravindra chavan kamlesh nikam sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • political news
  • Shiv Sena
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
1

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
2

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…
3

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
4

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.