PNB Scam : पीएनबी घोटाळा प्रकरणात नवे वळण! पुरव्याअभावी नीरव मोदीवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नीरव मोदीवर भारतात जवळजवळ २ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बॅंक (PNB)फसवणूक, मनी लॉंड्रिंग आणि इतर काही गुन्हेगारी खटले दाखल होते. CBI ने नीरव मोदीसह त्याच्या कंपन्या आणि इतर संचालकांविरोधातही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम १३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता CBI ने न्यायालयासमोर विस्तृत तपासात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींविरोधात कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.
परंतु CBI च्या तपासानंतर भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करण्यात आले असून केवळ फसवणूक आणि कटाचे आरोप त्यांच्यावर आहेत. CBI च्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि आरोप पत्रावर सामान्य मजिस्ट्रेट न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. माहितीनुसार, केवळ खासगी व्यक्तींविरोधातच आरोपपत्र सादर केले जाणार आहे. यामुे हे प्रकरण विशेष CBI न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नसेल.
पीनएबीचे उप-महाव्यवस्थापक अवनीश नेपालिया यांच्या तक्रारकीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये नीरव मोदी, रवी शंकर गुप्ता, विपुल अंबानी आणि फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड व फायरस्टार डायमंड्स इंटरनॅशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, प्रवर्तक आणि कंपीन अधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांवर ३२१.८८ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
दुसरीकडे नीरव मोदीने लंडन हायकोर्टत भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु लंडन हायकोर्टाने ही याचिका फेटाळली असून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये नीरव मोदीला भारतात पाठवण्याची लंडन हाय कोर्टाने हमी दिली होती. यामुळे नीरव मोदीला मोठ धक्का बसला आहे. त्याच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द झाले असले तरी फसवणूक व कटाचे आरोप कायम आहेत.
ED चा मोठा दणका! नीरव मोदी, विजय मल्यासह 21 जण ‘फरारी गुन्हेगार’ घोषित; 2178 कोटींची मालमत्ता जप्त






