Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PoK Protests: पाकव्याप्त काश्मीरमध्ये शहबाज-मुनीर जोडीचा क्रूर डाव; आंदोलने चिरडण्यासाठी जनतेची केली रसद बंद, धरले वेठीशी

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लोक दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून रस्त्यावर उतरले आहेत. ते पाकिस्तानी सरकार आणि लष्कराच्या विरोधात निदर्शने करत आहेत, तर दुसरीकडे सरकार बळाचा वापर करून ही निदर्शने दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 25, 2026 | 01:00 PM
pok protests humanitarian crisis shehbaz sharif asim munir blockade food medicine shortage rawalakot-muzaffarabad

pok protests humanitarian crisis shehbaz sharif asim munir blockade food medicine shortage rawalakot-muzaffarabad

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा अमानुष छळ
  • नागरिक हवालदिल, महागाई गगनाला
  • १२ जागांवरून संघर्षाची ठिणगी

PoK protests 2026 rawalakot muzaffarabad : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या अत्यंत भयानक आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून रस्त्यावर उतरलेल्या स्थानिक नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सरकार आणि तिथल्या लष्कराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या प्रशासनाने या भागातील जनआंदोलन दडपण्यासाठी थेट लोकांच्या अन्न, पाणी आणि औषधांवरच गदा आणली आहे. आंदोलकांना शरण येण्यास भाग पाडण्यासाठी संपूर्ण प्रदेशाची आर्थिक आणि अन्न नाकेबंदी करण्यात आली असून, यामुळे येथील लाखो नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत.

स्थानिक रहिवासी, मालवाहू ट्रक चालक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांना पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून जाणीवपूर्वक रोखले जात आहे. आझाद पट्टणसारख्या मुख्य सीमा मार्गांवर प्रवाशांना आणि मालवाहू वाहनांना अडवून त्यांच्याकडील अन्नपदार्थ फेकून दिले जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पाकिस्तानी अधिकारी आंतरराष्ट्रीय स्तरावर या नाकेबंदीचे खंडन करत असले, तरी जमिनीवरील वास्तव कमालीचे भीषण बनले असून स्थानिक जनतेमध्ये पाकिस्तान प्रशासनाविरोधात प्रचंड संताप उसळला आहे.

दैनंदिन जीवन विस्कळीत, पूंछ आणि मुझफ्फराबादमध्ये हाहाकार

‘संयुक्त आवामी कृती समिती’च्या (JAAC) नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या बंद आणि संपामुळे संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच सरकारी यंत्रणेने केलेल्या नाकेबंदीमुळे अन्नधान्य आणि इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवू लागला आहे. मुझफ्फराबाद, पूंछ आणि रावळकोट यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून लोकांना साधे पीठ आणि रेशन मिळालेले नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या अन्नधान्याचे भाव गगनाला भिडले असून काळ्या बाजाराला ऊत आला आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचा थेंबही शिल्लक नसल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपाने भीषण तांडव; 22 मजली इमारत जमीनदोस्त, जपानसह अनेक देश हादरले

या संकटाची सर्वात मोठी झळ लहान मुले आणि रुग्णांना बसत आहे. स्थानिक नागरिक मुहम्मद मस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फराबादमधील बहुतांश औषध दुकाने पूर्णपणे बंद आहेत. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधेही बाजारात उपलब्ध नाहीत. इंटरनेट सेवा प्रशासनाने आधीच खंडित केल्यामुळे लोकांना बाहेरील जगाशी संपर्क साधणे किंवा आपत्कालीन मदत मिळवणे अशक्य झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून “जर तुम्ही अन्न, पेय आणि औषधे फेकून दिलीत, तरच तुम्हाला सोडून दिले जाईल,” अशी धमकीवजा वागणूक दिली जात असल्याने नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे.

निवडणुकीतील फेरफार आणि आंदोलनाचा भडका

पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पीटीआयने (PTI) शहबाज शरीफ आणि लष्कराच्या या ‘घृणास्पद’ धोरणावर तीव्र टीका केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील या ताज्या अशांततेच्या मागे राजकीय कारणे आहेत. काश्मीरमधील निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ विधानसभा जागांवरून हा संपूर्ण विवाद सुरू झाला आहे. स्थानिक संघटनांचा असा आरोप आहे की, इस्लामाबादमधील केंद्र सरकार या जागांचा वापर करून येथील स्थानिक निवडणुकांवर प्रभाव पाडते आणि आपल्या मर्जीतील बाहुले सरकार (Puppet Government) स्थापन करते. यामुळे स्थानिक जनतेला त्यांच्या राजकीय आणि लोकशाही हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Nuclear: ‘अण्वस्त्रेच जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवू शकतात!’ रशियाचे खळबळजनक विधान; ‘न्यू स्टार्ट’ करार संपल्याने तणाव

पाकिस्तानी सरकारने आंदोलन रोखण्यासाठी ‘संयुक्त आवामी कृती समिती’वर (JAAC) बंदी घातली असली, तरीही लोकांचा रोष कमी झालेला नाही. रावळकोट आणि मुझफ्फराबादमध्ये हजारो महिला, पुरुष आणि अगदी शाळकरी मुलांनीही या हुकूमशाही विरोधात भव्य मोर्चे काढले आहेत. तज्ञांच्या मते, पाकिस्तान सरकार थेट लष्करी बळाचा वापर करून रक्त सांडण्याऐवजी, संपूर्ण काश्मीरला उपाशी ठेवून शरणागती पत्करण्यास भाग पाडत आहे. ही रणनीती मानवी हक्कांचे उघड उल्लंघन असून, यामुळे येत्या काळात संपूर्ण पाकमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Pok protests humanitarian crisis shehbaz sharif asim munir blockade food medicine shortage rawalakot muzaffarabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • kashmir
  • Pakistan News
  • POK

संबंधित बातम्या

Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
1

Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
2

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Pakistan IED Blast : बलुचिस्तानमध्ये शक्तिशाली स्फोटाने खळबळ; 2 ठार, मानवाधिकार संघटना आक्रमक अन् आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
3

Pakistan IED Blast : बलुचिस्तानमध्ये शक्तिशाली स्फोटाने खळबळ; 2 ठार, मानवाधिकार संघटना आक्रमक अन् आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी

Pakistan Hindus: ‘आम्ही 3-4 टक्के हिंदूंना सहन करतोय…’ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यदिनी प्रक्षोभक अन् वादग्रस्त
4

Pakistan Hindus: ‘आम्ही 3-4 टक्के हिंदूंना सहन करतोय…’ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यदिनी प्रक्षोभक अन् वादग्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.