Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PoK Protest: ‘एक जरी वाचला तरी…’ PoK मध्ये रक्ताची होळी; पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरुद्ध JAAC ची आरपारची लढाई

PoK Protests:पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. गेल्या ४८ तासांत सुरक्षा दलांच्या कारवाईत ३१ नागरिक ठार झाले असून, त्यामुळे ५ जूनपासून आतापर्यंतचा एकूण मृतांचा आकडा ८० च्या वर गेला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 29, 2026 | 02:53 PM
जेन-झी पुन्हा रस्त्यावर; सरकारविरोधात आवाज उठवत केली पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

जेन-झी पुन्हा रस्त्यावर; सरकारविरोधात आवाज उठवत केली पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या गोळीबारात ३१ जणांचा मृत्यू
  • JAAC चा आंदोलनाचा निर्धार
  • मशिदीत नमाजादरम्यान गोळीबार व प्रसारमाध्यमांवर बंदी

पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये (PoJK) सध्या अत्यंत भयावह आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सरकार आणि तेथील क्रूर लष्कराच्या दडपशाहीविरोधात स्थानिक नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता रक्ताळलेले स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या ४८ तासांत पाकिस्तानी सुरक्षा दलांनी निदर्शकांवर केलेल्या थेट आणि अमानुष गोळीबारात किमान ३१ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या नव्या हिंसाचारामुळे ५ जूनपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक जनआंदोलनात प्राणास मुकलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता ८० च्या वर पोहोचली आहे.

पाकिस्तानच्या लष्करी प्रशासनाकडून अमानुष अत्याचार, अश्रूधूर आणि थेट गोळीबार केला जात असला, तरी स्थानिक जनतेचा आक्रोश शमण्याचे नाव घेत नाही आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीने (JAAC) स्पष्ट केले आहे की, लष्कराच्या या दडपशाहीला नागरिक अजिबात घाबरणार नाहीत. संयुक्त आवामी कृती समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केला आहे की, पाकीस्तानी लष्कर आणि पोलिस दले निष्पाप, निःशस्त्र नागरिकांवर अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करत आहेत.

“एक व्यक्ती जरी वाचली तरी मुझफ्फराबाद मोर्चा थांबणार नाही!”

जेएएसी (JAAC) चे वरिष्ठ नेते सरदार उमर नझीर काश्मिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तान सरकार आणि लष्कर हे आंदोलन चिरडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, आपल्या मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेली ही जनता मागे हटणार नाही. त्याच वेळी, दुसरे प्रमुख नेते सरदार अमन काश्मिरी यांनी एका जाहीर निवेदनात अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, “पाकिस्तानच्या या क्रूर ताब्यापासून आणि अन्यायापासून पूर्ण मुक्ती मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. जरी आमच्यापैकी एक जरी व्यक्ती जिवंत वाचली, तरी आमचा मुझफ्फराबादच्या दिशेने निघणारा लाँग मार्च सुरूच राहील.” या घोषणेमुळे आंदोलकांमध्ये नवे चैतन्य पसरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भीषण भूकंप; 13 ठार, सोनीने रोखले सेमीकंडक्टरचे उत्पादन, भारताकडून मदतीचा हात

पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, मीरपूर येथील बिलाल मशिदीत नागरिक नमाज अदा करत असतानाच पाकिस्तानी सैन्याने तिथे अचानक गोळीबार सुरू केला. या दुर्दैवी घटनेत खारियान भागाचे प्रसिद्ध इमाम, मौलाना इनायतुल्ला यांच्या डोक्यात थेट गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पवित्र ठिकाणी झालेल्या रक्तरंजित कारवाईमुळे संपूर्ण पीओकेमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानी लष्कराचा निषेध सुरू केला आहे.

PoK protests group has publicly confirmed at least 20 deaths in Rawalakot, while wider reports have placed the combined toll across Rawalakot and Mirpur as high as 31. #PoJKProtests #Rawalakot #PakistanCrackdown pic.twitter.com/F1gRkUlSS6 — Navya (@Navya_pavi) July 29, 2026

credit – social media and Twitter

प्रसारमाध्यमांची गळचेपी अन् आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता

पाकव्याप्त काश्मीरमधील हे भयानक वास्तव जगासमोर येऊ नये म्हणून पाकिस्तान सरकारने वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे. जिओ न्यूजचे ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार शहजाद इक्बाल यांनी या दडपशाहीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी उघडपणे सवाल केला की, जर हे आंदोलक खरोखरच ‘भारत-समर्थित’ किंवा देशद्रोही होते, तर पाकिस्तान सरकारने त्यांच्या ३८ पैकी ३६ मागण्या का मान्य केल्या होत्या? शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून बसल्याने तिथली खरी परिस्थिती बदलणार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी शाहबाज शरीफ सरकारला फटकारले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PoK Elections: ‘रडगाणे गाऊन जनादेश बदलणार नाही’; पाकिस्तानमध्ये निवडणुकीवरून मरियम नवाज आणि बिलावल भुट्टो यांच्यात खडाजंगी

सध्या संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर एका बारुदाच्या ढिगाऱ्यावर बसले आहे. संयुक्त आवामी कृती समिती रोज मारल्या गेलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर करत आहे, परंतु पाकिस्तानी सैन्याकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. स्वतंत्र पत्रकार आणि मानवाधिकार संघटनांना तिथे जाण्यास मनाई असल्याने या भागातील वास्तव अधिकच चिंताजनक बनले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तानच्या या मानवाधिकार उल्लंघनावर जोरदार टीका होत असून संयुक्त राष्ट्रांनी (UN) देखील या हिंसेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Pok protests pakistan army firing 31 killed jaac muzaffarabad march marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Pakistan News
  • POK
  • PoK Elections

संबंधित बातम्या

Balochistan : बलुचिस्तान पेटले! सैनिकांच्या बेछूट गोळीबारात निष्पाप बालकांचा बळी; संतप्त नागरिकांचे महामार्गावर धरणे
1

Balochistan : बलुचिस्तान पेटले! सैनिकांच्या बेछूट गोळीबारात निष्पाप बालकांचा बळी; संतप्त नागरिकांचे महामार्गावर धरणे

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी
2

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
3

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.