Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

BLA Hakkal Video : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) दोन हल्ल्यांमध्ये २५ पाकिस्तानी लष्करी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे, त्यामुळे अशांत बलुचिस्तान प्रांतात तणाव वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 06, 2026 | 02:07 PM
Balochistan Liberation Army BLA 2026 25 Pakistani soldiers killed Balochistan

Balochistan Liberation Army BLA 2026 25 Pakistani soldiers killed Balochistan

Follow Us
Follow Us:
  • २५ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
  • ‘ॲक्शन’ व्हिडिओ आणि शस्त्रास्त्रांची लूट
  • लष्कराची प्रत्युत्तराची कारवाई

पाकिस्तानचा सर्वात मोठा परंतु मागासलेला आणि अशांत प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये हिंसाचाराचा भीषण भडका उडाला आहे. बलुच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (BLA) या बंडखोर संघटनेने गुरुवारी आणि शुक्रवारी दोन मोठे समन्वित हल्ले घडवून आणत पाकिस्तानच्या तब्बल २५ लष्करी जवानांना ठार केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या भीषण हल्ल्यानंतर BLA (BLA Hakkal Video) ने थेट व्हिडिओ जारी करून पाकिस्तानी लष्कराची उघडी पडलेली सुरक्षा यंत्रणा जगासमोर आणली आहे, ज्यामुळे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बंडखोर संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पहिला आणि सर्वात भीषण हल्ला ‘झियारत क्रॉस’जवळ पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आला. BLA च्या अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या ‘फतेह स्क्वॉड’च्या (Fateh Squad) बंडखोरांनी सैन्याच्या ताफ्याला घेरून अचानक अंधाधुंध गोळीबार आणि स्फोट केले. या आंबुश (Ambush) हल्ल्यात लष्कराचा एक मोठा ट्रक आणि आणखी एक वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. या एकाच हल्ल्यात १८ पाकिस्तानी सैनिकांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच सैनिक गंभीर जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार

‘हक्काल’ व्हिडिओद्वारे लष्कराची शस्त्रास्त्रे लुटतानाचे दृश्य सार्वजनिक

हल्ल्याच्या काही तासांतच BLA च्या ‘हक्काल’ (Hakkal) या अधिकृत मीडिया शाखेने सोशल मीडियावर एक मिनिट ११ सेकंदांचा थरारक व्हिडिओ जारी केला. एखाद्या सिनेमॅटिक शैलीत तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये आगीच्या ज्वाळांमध्ये वेढलेली पाकिस्तानी लष्कराची वाहने, जमिनीवर पसरलेले जवानांचे मृतदेह आणि BLA चे सशस्त्र बंडखोर अगदी जवळ उभे असलेले स्पष्ट दिसत आहेत. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात बंडखोर निष्प्रभ झालेल्या लष्करी वाहनांमधून रायफल्स, दारूगोळा आणि आधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करताना दिसत आहेत.

📍 Ziarat Ambush, Balochistan. BLA releases videos of Ziarat attack on Pak army convoy. More than 25 pak army’s foot soldiers killed while big generals enjoy their luxurious life in DHA. BLA warns more attacks. pic.twitter.com/nyo1tIeOpg — Sagar STORM🔳 (@AlexAllone1) September 5, 2026

credit – social media and Twitter

झियारत क्रॉस येथील हल्ल्यानंतर लगेचच BLA च्या ‘स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉड’ने (STOS) सुरबच्या हाजिका भागात दुसरी मोठी कारवाई केली. येथे बंडखोरांनी रिमोट-कंट्रोलद्वारे स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा भीषण स्फोट घडवून आणला. या आयइडी (IED) स्फोटात लष्कराचे आणखी एक वाहन नष्ट झाले आणि ७ सैनिकांचा मृत्यू झाला. दोन्ही हल्ले मिळून एकूण २५ सैनिक ठार झाल्याची पुष्टी BLA चे प्रवक्ते जीयंद बलुच यांनी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश

पाकिस्तानी लष्कराची रात्रीच्या अंधारात मृतदेह हलवण्याची कसरत अन् प्रतिहल्ला

या भीषण पराभवानंतर पाकिस्तानी लष्कराने किंवा प्रशासनाने अधिकृतपणे सैनिकांच्या मृत्यूची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर स्थानिक पत्रकारांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, ठार झालेल्या सैनिकांचे मृतदेह रात्रीच्या अंधारात गुप्तपणे त्यांच्या मूळ गावी पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या अपमानास्पद हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने मस्तुंग, सिबी, क्वेट्टा आणि कलात जिल्ह्यांमध्ये व्यापक कॉर्डन-अँड-सर्च ऑपरेशन्स (Cordon and Search) सुरू केले. या कारवाईत सुमारे ५० बंडखोरांना कंठस्नान घातल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला आहे.

बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून केंद्र सरकार आणि लष्कराविरुद्ध बंडखोरी सुरू आहे. नैसर्गिक संसाधनांची लूट, स्थानिक बलुच नागरिकांवर होणारे मानवाधिकार उल्लंघन आणि ‘सक्तीने बेपत्ता करणे’ (Enforced Disappearances) याविरोधात BLA सह अनेक संघटना सशस्त्र लढा देत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ‘ऑपरेशन हेरॉफ’च्या माध्यमातून BLA ने अनेक महामार्ग आणि रेल्वे स्थानके ठप्प केली होती. आता ताज्या व्हिडिओ आणि हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमधील लष्कराचे नियंत्रण सुटत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Web Title: Balochistan liberation army claims 25 pakistani soldiers killed hakkal video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Balochistan
  • Pakistan Attack
  • Pakistan News
  • Video Viral

संबंधित बातम्या

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral
1

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
2

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video
3

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

LeT Terrorist Abu Hashim: हाफिज सईदच्या जवळचा साथीदार अबू हाशिमचा लाहोरमध्ये गूढ मृत्यू; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला
4

LeT Terrorist Abu Hashim: हाफिज सईदच्या जवळचा साथीदार अबू हाशिमचा लाहोरमध्ये गूढ मृत्यू; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.