पापुआ न्यू गिनीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीच्या (Papua New Guinea) उत्तरेकडील हाईलँड्स भागातील प्रातांत किमान 64 लोकांची हत्या करण्यात आली आहे. इंगा प्रांतातील वापेनमांडा जिल्ह्यात दोन जमातीमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात 64 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
[read_also content=”अश्विन रामास्वामी ठरला अमेरिकेत निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन Gen Z उमेदवार! https://www.navarashtra.com/world/ashwin-ramaswami-becomes-first-indian-american-to-gen-z-to-contest-ekection-nrps-508755.html”]
रिपोर्टनुसार, एम्बुलिन आणि सिक्कीन जमातींमध्ये हा हिंसाचार (Ambulin and Sikin tribes) झाला. यावेळी त्यांच्यात चकमक उडाली. दोन्ही जमातीच्या लोकांनी एके-47 आणि एम-4 रायफलने एकमेकांवर गोळीबार केला. सोमवारी सकाळपर्यंत ६४ मृतदेह रस्त्याच्या कडेला, गवताळ प्रदेशात आणि वापेनमांडाच्या टेकड्यांवर विखुरलेले आढळले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज काकस म्हणाले, ही आतापर्यंतची सर्वात मोठी हत्याकांडाची घटना आहे. हे घृणास्पद आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ग्राफिक व्हिडिओ आणि छायाचित्रे मिळवली, ज्यात रस्त्याच्या कडेला आणि एका फ्लॅटबेड ट्रकच्या मागे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसत आहेत. एजन्सीने सांगितले की सैन्याने या भागात सुमारे 100 सैनिक तैनात केले आहेत, परंतु त्यांचा प्रभाव मर्यादित आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं सुरू आहे.






