
Pope Leo lung cancer news Vatican medical bulletin Pope Leo
जगातील सुमारे १४० कोटी (१.४ अब्ज) कॅथोलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ (Pope Leo) यांना फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अवघ्या १७ महिन्यांपूर्वी मे २०२५ मध्ये पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर सर्वोच्च धर्मगुरू पदावर विराजमान झालेल्या ७१ वर्षीय पोप लिओ यांच्या उजव्या फुफ्फुसात ही गाठ आढळली आहे. अलिकडेच पार पडलेल्या एका शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना या ट्यूमरची माहिती मिळाली. व्हॅटिकनने जारी केलेल्या अधिकृत वैद्यकीय बुलेटिननुसार, पोप लिओ यांच्या उजव्या फुफ्फुसाचा बाधित भाग यशस्वीरीत्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला आहे.
वैद्यकीय परिभाषेत पोप यांना झालेल्या कर्करोगाच्या या प्रकारास ‘ॲडेनोकार्सिनोमा’ (Adenocarcinoma) असे म्हटले जाते. हा फुफ्फुसाच्या कर्करोगाचा अत्यंत सामान्य प्रकार मानला जातो. सुदैवाने, शस्त्रक्रियेनंतर पोप लिओ यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
पोप लिओ यांच्या प्रकृतीबाबत जगभरातून चिंता व्यक्त होत असतानाच, वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी या आजाराबाबत महत्त्वपूर्ण विश्लेषण मांडले आहे. वॉशिंग्टन येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या हिमेटोलॉजी-ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. स्टीफन लिऊ यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जर फुफ्फुसाचा कर्करोग प्राथमिक टप्प्यात (Early Stage) असेल आणि तो लिम्फ नोड्स किंवा शरीराच्या इतर भागांत पसरलेला नसेल, तर केवळ शस्त्रक्रिया करून बाधित भाग काढणे हा त्यावर अत्यंत प्रभावी उपचार ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय
तथापि, जर अंतिम लॅब रिपोर्टमध्ये कर्करोगाचा संसर्ग इतर अवयवांमध्ये पसरल्याचे दिसून आले, तर रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर बनू शकते. व्हॅटिकनच्या प्रेस ऑफिसने जारी केलेल्या सुरुवातीच्या अहवालात कर्करोगाच्या स्टेजबद्दल किंवा त्याच्या प्रसाराबद्दल सविस्तर तांत्रिक माहिती दिलेली नाही, तरीही डॉक्टरांच्या पथकाने पोप यांच्या सध्याच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
Pope Leo XIV underwent thoracic surgery at Gemelli Hospital on Tuesday afternoon, as planned, according to a statement from Dr. Luigi Carbone and Professor Stefano Margaritora released by the Holy See Press Office. The surgeons removed the lower lobe of the Pope’s right lung, and tissue examined during the operation confirmed the diagnosis of “lung adenocarcinoma,” as suspected from tests conducted beforehand. The Pope was in the operating room approximately three hours, while the operation itself lasted about 90 minutes. The doctors said it was successful and there were no complications. Pope Leo awoke normally after surgery and, following a brief period of observation, returned to his room on the hospital’s 10th floor, according to the statement.
https://t.co/63Fs28LCZJ — Vatican News (@VaticanNews) October 13, 2026
credit – social media and Twitter
पोप लिओ यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना पूर्ण विश्रांतीची आणि वैद्यकीय निरीक्षणाची गरज आहे. ही बाब विचारात घेऊन व्हॅटिकन प्रशासनाने पुढील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोप लिओ २० ऑक्टोबरपर्यंत रुग्णालयातच राहून उपचार घेणार आहेत. त्यामुळे या कालावधीतील त्यांचे सर्व नियोजित दौरे, विशेष धार्मिक सभा, मुत्सद्दी भेटी आणि सार्वजनिक दर्शन कार्यक्रम तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.
व्हॅटिकनने जगभरातील भाविकांना पोप लिओ यांच्या जलद आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले असून, त्यांच्या तब्येतीत होणाऱ्या सुधारणेबाबत वेळोवेळी वैद्यकीय बुलेटिन जारी केले जातील असे आश्वासनही दिले आहे.
पोप लिओ यांच्या आजारपणामुळे एक मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण झाला आहे की, पोप अनुपस्थित असताना व्हॅटिकन सिटी आणि कॅथोलिक चर्चचे प्रमुख निर्णय कोण घेणार? व्हॅटिकनच्या शतकानुशतके जुन्या नियमांनुसार आणि कॅनन लॉ (Counsil/Canon Law) च्या चौकटीत, पोप हयात आणि पदावर असताना त्यांच्या जागी कोणत्याही ‘अंतरिम उत्तराधिकारी’ किंवा ‘कार्यवाहक पोप’ची नियुक्ती करण्याची तरतूद नाही.
याचा अर्थ असा की, ज्या निर्णयांसाठी किंवा धोरणात्मक करारांसाठी थेट पोप यांची स्वाक्षरी किंवा मान्यता आवश्यक असते, ते सर्व महत्त्वपूर्ण निर्णय आणि धार्मिक प्रक्रिया पोप पूर्णपणे बरे होईपर्यंत पुढे ढकलल्या जातील. परंतु, याचा अर्थ व्हॅटिकनचे रोजचे काम थांबेल असा मुळीच नाही. व्हॅटिकनच्या विविध प्रशासकीय विभागांचे (Curia) दैनंदिन प्रशासकीय कामकाज, आर्थिक बाबी आणि नियमित व्यवस्थापन नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?
पोप लिओ यांनी आपल्या १७ महिन्यांच्या अल्प कार्यकाळात जागतिक शांतता, मानवी हक्क आणि ख्रिश्चन समुदायात एकतेचा संदेश दिला आहे. त्यामुळेच त्यांच्या आजारपणाची बातमी समजताच केवळ कॅथोलिकच नव्हे, तर विविध धर्मीय नेत्यांनी आणि जागतिक राष्ट्रप्रमुखांनी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा संदेश पाठवले आहेत.
सध्या सर्व जगाचे लक्ष २० ऑक्टोबरनंतर येणाऱ्या वैद्यकीय अहवालाकडे आणि पोप लिओ यांच्या रुग्णालयातून होणाऱ्या डिस्चार्जकडे लागले आहे. व्हॅटिकन प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वैद्यकीय सल्लागार मंडळाच्या हिरव्या कंदिल्यानंतरच पोप लिओ आपल्या सार्वजनिक कर्तव्यांवर पुन्हा रुजू होतील.
Ans: पोप लिओ यांना उजव्या फुफ्फुसाचा कर्करोग (ॲडेनोकार्सिनोमा / Adenocarcinoma) झाला असून शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमर काढण्यात आला आहे.
Ans: नाही, व्हॅटिकनच्या नियमांनुसार पोप पदावर असताना कोणताही कार्यवाहक किंवा अंतरिम उत्तराधिकारी नियुक्त केला जात नाही.
Ans: वैद्यकीय उपचारांमुळे आणि विश्रांतीसाठी पोप लिओ यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम २० ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.