President Modi arrives in Thailand for two-day BIMSTEC Summit, receives warm welcome
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या थांयलंड दौऱ्यावर गुरुवारी (03 एप्रिल) पोहोचले आहेत. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या विमानतळावर पोहोचल्यावर भारतीय समुदायच्या लोकांशी संवाद साधला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी, थाई रामायणाचे नाट्यप्रदर्शन पाहिले. आज पंतप्रधान मोदी थायलंडचे पंतप्रधान पाईतोंग्तार्न शिनवात्रा यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर चर्चा होईल.
तसेच दोन्ही देश व्यापार संबंध दृढ करणाऱ्यावर देखील चर्चा करणार आहेत. सुरक्षा, संरक्षण आणि सांस्कृतिक संबंधावर देखील चर्चेदरम्यान लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच मान्यमार मार्गे होणाऱ्या नोकरीच्या नावाखालील फसवणुकीचीही चर्चा या बैठकी दरम्यान होणार आहे.
या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी(04 एप्रिल) BIMSTEC शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेनंतर पंतप्रधान बांगलादेशचे अंतरिम सरकारप्रमुख यूनुस खान यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय थायलंडचे राजा महा वजीरालोगंकोरन आणि राणी सुथिदा यांचीही पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत.
भारत आणि थायलंडचे संबंध 2 हजार वर्षांहून अधिक प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या काळात थायलंडमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला होता. या ठिकाणी रामायणाला रामकियेन म्हणताता आणि थाई संस्कृतीचा याचा मोठा प्रभाव आहे. थायलंड आर्थिकदृष्ट्या आशियाई मधील भारताचाय चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. थायलंडच्या कंपन्यांनी भारताच्या उर्जा, ऑटोमोडिव्ह, रिएल इस्टेट आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणुक केवली आहे. 2004 मध्ये दोन्ही देशांनी अर्ली हार्वेस्ट स्कीम मार्फत 83 उत्वादनांवरील व्यापर सुलक्ष करण्याच्या करार केला होती.
थायलंड म्यानमार आणि लाओस यांच्या सीमावर्ती भागाला गोल्डन ट्रायंगल म्हणतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्र्गज तस्करी आणि अवैध व्यवसाय केले जातता. यामुळे थायलंडच्या या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी या समस्येवर उपायोजना करण्यासाठी सुरक्षा आणि गुप्तचर क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा करणार आहेत.
भारतीय पर्यटकांसठी थायलंड हा तिसऱ्या क्रमांकाचे आवडते पर्यटनस्थळ आहे. 2024 मध्य़े 21 लाक भारतीयांनी थायलंडला भेट दिली होती. तसेच थायलंडमधून बौद्ध धर्मीय नागरिक भारतात बोधगया,. सारनाथ आणि कुशीनगर तीर्थयात्रेला येतात. शिवाय भारताच्या ‘Act East’ धोरणात थायलंड हा महत्वपूर्ण भागीदार आहे. यामुळे नरेंद्र मोदींचा हा दौरा दोन्ही देशांतील व्यापाराच्या, द्विपक्षीय संबंधाच्या, सांस्कृतिक, आर्थिक, आणि सुरक्षा संबंध दृढ करण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानसा जात आहे.