ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण (फोटो सौजन्य: iStock)
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी 02 एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये अमेरिकेचा मुक्ती दिवस (Liberation Day) घोषित केला. यासह त्यांनी जागतिक स्तरावर सुमारे भारतासह 60 देशांमध्ये परस्पर कर जाहीर केला. ट्रम्प यांनी भारतावर 26% टक्के कर आकारला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर भारतातील IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. Infosys, TCS, Wipro यांसारख्या मोठ्या आणि प्रमुख कंपन्यांचे शेअर्स धडाधडा कोसळले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याच्या निर्णयामुळे Nasdaq फ्युचर्समध्ये तीव्र घसरण झाली. याचा परिणामी भारतीय बाजाराताही याचा नकारात्क परिणाम दिसून आला. यामुळे Nifty IT निर्देशांकांत सर्वात मोठी घसरण झाली.
शिवाय, पर्सिस्टंट सिस्टम (Persistent Systems ) आणि कोफोर्ज (Coforge ) सारख्या मिडकॅपमध्ये IT कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे 9% ते 6.5% पर्यंत घसरले. तसेच एनफोसिस (Infosys ) आणि केपीआयटी टेक ( KPIT Tech ) चे शेअर्स 4 ते 5% पर्यंत खाली आले. सर्वाधिक नुकसानग्रस्त ओरेकल फायनान्शियल (Oracle Financial ) असून याच्या शेअर्समध्ये 40% पर्यंत घट झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कर जाहीर केल्यानंतर एक दिवसांनी गुरुवारी (03 एप्रिल) सकाळी Nasdaq फ्युचर्स 600 अकांनी खाली आला, म्हणजे जवळपास 3% पेक्षा अधिक घसरण झाली. ही घसरण अशी राहिली कर शेअर बाजाराचा निर्देशांक 17 हजारच्या पाकळी खाली उतरू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% परस्पर शुल्क लादले आहे. परंतु भारताच्या IT क्षेत्रावर कोणत्याही शुल्काची थेट घोषमा करण्यात आलेली नाही. व्हाईट हाऊसच्या Annexure नुसार IT क्षेत्रावर 27% कर प्रत्यक्षात लावण्यात आले आहे. यामुळे भारतीय IT कंपन्याच्या महसुलावर मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये Nifty IT निर्देशांकांत 17% घसरला आहे. यामुळे नकारात्मक घटक किंमतींमध्ये दिसून आला आहे. कोफोर्ज, एनफोसिस आणि केपीआयटी टेकचे हे शेअर्स मध्ये गुंतवणूकीसाठी सध्या प्राधान्य असतील, तर TCS, Wipro, HCLTech आणि Tata Technologies गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 10 एप्रिल पर्यंत TCS मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सध्या गुंतवणूक दारांचे याकडे लक्ष आहे.