PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पाकिस्तानमधील राजकीय तणाव आता एका अत्यंत नाजूक वळणावर येऊन पोहोचला आहे. देशाचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ (PTI Protest) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पीटीआयने केंद्र सरकारविरोधात उघड संघर्ष पुकारला आहे. सरकारसोबत झालेली चर्चेची दुसरी फेरी पूर्णपणे निष्फळ ठरल्यानंतर, खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि प्रांतीय अध्यक्ष जुनैद अकबर खान यांच्या नेतृत्वाखाली लाखो समर्थकांच्या ताफ्याने राजधानी इस्लामाबादच्या दिशेने कूच केले आहे. लक्की मारवत येथील गांधी चौकातून रविवारी दुपारी निघालेला हा मोर्चा आता पाकिस्तानच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडवून आणण्याच्या तयारीत आहे.
या लाँग मार्चमध्ये टँक, डेरा इस्माईल खान, दक्षिण वझिरीस्तान, उत्तर वझिरीस्तान, बन्नू आणि करक या भागातील हजारो समर्थक आणि प्रांतीय नेते सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी स्पष्ट केले आहे की, हा ताफा ८ ऑक्टोबरपर्यंत खैराबाद येथे पोहोचेल आणि तिथून आंदोलनाची पुढील आक्रमक रणनीती जाहीर केली जाईल. स्वाबी आणि करक भागात पोहोचताना या मोर्चात लाखो लोकांचा जनसमुदाय सामील होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय तणाव कमी करण्यासाठी आणि रस्त्यावरील आंदोलन टाळण्यासाठी पीटीआयची वाटाघाटी समिती शुक्रवारी इस्लामाबादला पोहोचली होती. सरकार आणि पीटीआय यांच्यात दोन दिवस बंद दाराआड चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. मात्र, कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय रविवारी पहाटे या बैठका अनिर्णित अवस्थेत संपल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार
पीटीआय पक्षाने सरकारच्या समोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या: १. अदियाला तुरुंगात असलेल्या ७३ वर्षीय इम्रान खान यांना त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांकडून योग्य वैद्यकीय तपासणी आणि उपचाराची संधी मिळणे. २. सर्वोच्च न्यायालयाच्या १८ ऑगस्टच्या आदेशानुसार, दृष्टीच्या समस्येमुळे त्यांना इस्लामाबादमधील खाजगी रुग्णालयात हलवणे. ३. आंदोलनापूर्वी अटक करण्यात आलेल्या इम्रान खान यांच्या बहिणी, समर्थक आणि कार्यकर्ते यांची त्वरित सुटका करणे. ४. त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांची योग्य वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावरील खटल्यांची निष्पक्ष सुनावणी होणे.
सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल केली असून इम्रान खान यांना बाहेर हलवण्यास नकार दिला आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमधील चर्चा पूर्णपणे फिस्कटली.
⚠️Government warns protesters
🚨#Pakistan: The government has been preparing for weeks for the arrival of #PTI demonstrators in #Islamabad. It has erected barriers using shipping containers to block main access routes to the capital. ▪️Interior Minister #Mohsin_Naqvi confirmed earlier on Sunday that the talks between the two sides had failed. He accused Afridi of “sabotaging” the negotiations, and added that the government would not allow the PTI to “create a disturbance”. ▪️He also cited an Islamabad High Court order from September 14, ruling that no political party or its leadership has the “lawful right to occupy public roads, highways, interchanges, toll plazas and buildings in Islamabad”. https://t.co/xbAtk4oPc6 https://t.co/tnQ81utE9D — ⚡️🌎 Sarwar 🌐⚡️ (@ferozwala) October 4, 2026
credit – social media and Twitter
मोर्चात सहभागी जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी केंद्र सरकार आणि देशातील शक्तिशाली व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “गेल्या ७९ वर्षांपासून जी मानसिकता देशावर लादली गेली आहे, तीच मानसिकता आता बंद दाराआड निर्णय घेऊन खैबर पख्तुनख्वाच्या जनतेवर लष्करी कारवाई लादण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आमचे सरकार पश्तून समाजाच्या हिताच्या विरोधात असलेला कोणताही निर्णय स्वीकारणार नाही.”
आफ्रिदी यांनी पुढे आरोप केला की, केंद्र सरकारला प्रांतात शांतता प्रस्थापित करण्यात रस नसून केवळ पीटीआय पक्ष संपवायचा आहे. प्रांतीय सरकारने १०० दिवसांत शांतता प्रस्थापित करण्याचे स्पष्ट धोरण दिले असतानाही केंद्र सरकार लष्करी आक्रमकतेचा मार्ग निवडत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, खैबर पख्तुनख्वामध्ये राज्यपाल राजवट किंवा आणीबाणी लागू करण्याच्या सर्व शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
दुसऱ्या बाजूला, शाहबाज शरीफ सरकार आणि गृह मंत्रालयाने या मोर्चाला उत्तर देण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. इस्लामाबादकडे येणाऱ्या सर्व मुख्य महामार्गांवर, उड्डाणपुलांवर आणि प्रवेशद्वारांवर मोठमोठे धातूचे शिपिंग कंटेनर्स ठेवून रस्ते पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. राजधानीत कलम १४४ लागू करण्यात आले असून अतिरिक्त पोलीस दल आणि निमकरमचारी सैन्याच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्ला यांनी आंदोलकांना इस्लामाबादमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. तर गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी लाहोरमधील पत्रकार परिषदेत बोलताना थेट मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना लक्ष्य केले. जर या आंदोलनादरम्यान हिंसेत कोणाचाही जीव गेला, तर त्याला केवळ आणि केवळ सोहेल आफ्रिदी जबाबदार असतील, असे नक्वी यांनी ठणकावून सांगितले आहे.
ऑगस्ट २०२३ पासून १०० हून अधिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पेटलेला हा राजकीय वणवा आता संपूर्ण पाकिस्तानला आपल्या कचाट्यात घेतो की सरकार हा मोर्चा रोखण्यात यशस्वी ठरते, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.






