Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, ‘हा अपघात रशियाने….’

कझाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या अपघातात 38 लोकांचा मृत्यू झाला आणि 29 जण जखमी झाला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2024 | 10:29 AM
कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, 'हा अपघात रशियाने....'

कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, 'हा अपघात रशियाने....'

Follow Us
Close
Follow Us:

मॉस्को: कझाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्याशी चर्चा करून दुःख व्यक्त केले आहे. हा अपघात बुधवारी झाला होता, ज्यामध्ये 38 लोकांचा मृत्यू झाला आणि 29 जण जखमी झाले. अझरबैजानी विमानाने बाकू येथून चेचन्याच्या ग्रोजनीकडे उड्डाण केले होते. उड्डाणानंतर थोड्याच वेळात मार्ग बदलून ते कझाकिस्तानमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला.

क्रेमलिनचे निवेदन

तर,  याबाबत रशियाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले की, बुधवारी ग्रोजनीजवळील वायू संरक्षण प्रणालींनी केलेल्या गोळीबारामुळे हा अपघात झाला. मात्र, विमान हे रशियन वायू संरक्षण प्रणालीच्या गोळीबाराचे लक्ष्य बनले असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. पुतिन यांनी अझरबैजानी अध्यक्षांशी फोनवर चर्चा करताना कझाकिस्तानमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेसाठी माफी मागितली आहे. क्रेमलिनने स्पष्ट केले की ही दुर्घटना त्यांच्या हवाई क्षेत्रात घडली असली, तरी ती रशियन हवाई संरक्षण यंत्रणेच्या चुकांमुळे घडल्याचे मान्य नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 2025 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने; काय असेल ड्रॅगनचे पुढील भविष्य, जागतिक बॅंकेचा अहवाल

38 लोकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानमध्ये झालेल्या या अपघातात 67 प्रवासी विमानात होते. अपघातानंतर विमानाने पेट घेतला. कझाकिस्तानच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 38 लोकांचा मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अझरबैजानच्या अभियोजक जनरल कार्यालयाने सांगितले की, ग्रोजनीमध्ये दुर्घटनेची तपासणी सुरू आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की, विमानाच्या मागील भागात काही छिद्रे दिसत आहेत.

तसेच विमानावर रशियन वायू संरक्षण प्रणालीचा गोळीबार झाला असावा, असा संशय विमानतज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या युक्रेन आणि रशियामधील संघर्षामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. युक्रेनने ड्रोन हल्ला केल्यामुळे रशियन वायू संरक्षण प्रणाली सक्रिय झाली होती. या संदर्भात विमान अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत तपासानंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येईल.

आंतरराष्ट्रीय पडसाद

या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडवली आहे. पुतिन यांनी केलेल्या माफीमुळे अझरबैजानसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न दिसून येतो. तसेच, विमान अपघाताचा तपशील समजून घेण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काय आहे ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’? पाकिस्तानने भारतावर केले गंभीर आरोप, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Putin expresses apology and regret over kazakhstan plane crash nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त
1

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर
2

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर
3

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO
4

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.