Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासाठी वरदान असलेले ‘ब्राह्मोस’ बनवण्यामागे आहे ‘या’ बड्या नेत्याचा वरदहस्त; डॉ. शिवथनु पिल्लई यांचा खुलासा

BrahMos origin denied China : भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा कणा ठरलेल्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रकल्पामागील एका मोठ्या गोष्टीचा आता उलगडा झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 26, 2025 | 04:31 PM
Putin key to BrahMos creation denied China Dr. Pillai

Putin key to BrahMos creation denied China Dr. Pillai

Follow Us
Close
Follow Us:

BrahMos origin denied China : भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा कणा ठरलेल्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रकल्पामागील एका मोठ्या गोष्टीचा आता उलगडा झाला आहे. या प्रकल्पाचे जनक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. शिवथनु पिल्लई यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ब्राह्मोस प्रकल्पात केवळ पाठिंबा दिला नाही, तर प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक लक्ष देत सर्व अडथळे दूर केले. विशेष म्हणजे, पुतिन यांनी या तंत्रज्ञानासाठी रशियाकडे मदतीची मागणी करणाऱ्या चीनला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यामुळे भारत आणि रशियामधील संरक्षण भागीदारी अधिक दृढ झाली, असे पिल्लई यांनी सांगितले.

ब्राह्मोस – भारताची सामरिक ताकद

ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारताच्या लष्करी तंत्रज्ञानातील एक ऐतिहासिक प्रगती मानली जाते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या एअरबेसवर अचूक आणि धडक हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरून गेला होता, कारण त्यांच्याकडे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासारखे कोणतेही तंत्रज्ञान नव्हते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पैशाने क्लास खरेदी करता येत नाही’, जेफ बेझोस लग्नाच्या कार्डवरून झाले ट्रोल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अतुलनीय रशियन साथ आणि पुतिन यांची वैयक्तिक भूमिका

डॉ. पिल्लई यांनी सांगितले की, 1991 च्या आखाती युद्धानंतर भारताने आपले संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्याचा संकल्प केला. त्यासाठी रशियाशी भागीदारी सुरू झाली.व्लादिमीर पुतिन यांनी ब्राह्मोस प्रकल्पासाठी वैयक्तिक पातळीवर रस दाखवून अनेक तांत्रिक आणि धोरणात्मक अडचणी दूर केल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे रशियातील टीम भारतात येऊन शांततेत काम करू शकली.

चीनला स्पष्ट नकार – भारतासाठी मैत्रीची कसोटी

डॉ. पिल्लई यांच्या मते, ब्राह्मोस प्रकल्प उघड झाल्यानंतर चीननेही रशियाशी संपर्क साधला आणि भारताला दिलेले तंत्रज्ञान आपल्यालाही द्यावे अशी मागणी केली. मात्र, पुतिन यांनी ठाम नकार देत सांगितले की हा भारत आणि रशियामधील शासकीय करार आहे आणि तो तोडणे शक्य नाही. ही गोष्ट अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत पोहोचली होती. पुतिन यांनी स्वतः त्यांना चीनच्या मागणीबद्दल सांगितले. यानंतर वाजपेयींनी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना याबद्दल माहिती दिली. फर्नांडिस यांनी ती माहिती डॉ. पिल्लई यांच्यापर्यंत पोहोचवली.

भारत-रशिया संरक्षण भागीदारीचा सुवर्ण अध्याय

ब्राह्मोस प्रकल्पात रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. आज ब्राह्मोस हे केवळ भारताचे सामरिक बळ नसून, निर्यातयोग्य उत्पादन देखील बनले आहे. अनेक देश ब्राह्मोस खरेदीसाठी भारताशी वाटाघाटी करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  ‘काका पूर्वीसारखे राहिलेले नाहीत’ डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह? पुतण्या फ्रेड ट्रम्प यांचा ‘खळबळजनक’ दावा

ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या यशामागे रशियन नेतृत्व

या खुलाशामुळे हे स्पष्ट झाले आहे की व्लादिमीर पुतिन हे भारताचे केवळ राजकीय मित्र नाहीत, तर सामरिक दृष्टीनेही विश्वासू भागीदार आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या यशामागे रशियन नेतृत्वाची भूमिका निर्णायक ठरली असून, चीनसारख्या प्रभावशाली देशालाही त्यांनी नकार दिला हे भारतासाठी गौरवाचे लक्षण आहे. या ऐतिहासिक सहकार्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्राला नवे उभारी मिळाली आणि भारतीय तंत्रज्ञान जगाच्या नकाशावर अधिक ठामपणे उभे राहिले.

Web Title: Putin key to brahmos creation denied china dr pillai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • india
  • international news
  • Russia
  • Russian President Putin

संबंधित बातम्या

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
1

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
2

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Birgunj Violent Protests: मशिदीवरील हल्ल्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी; रक्सौल सीमा बंद
3

Birgunj Violent Protests: मशिदीवरील हल्ल्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी; रक्सौल सीमा बंद

Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर
4

Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.