
Putin orders military studya on nuclear testing after Trump's remarks
Russia News today in Marathi : मॉस्को : सध्या जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या न्यूक्लिर टेस्टिंगच्या आदेशानंतर आता रशियाने देखील न्यूक्लियर टेस्टिंगसाठी तयारी सुरु केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vldimir Putin) यांनी सैन्याला तयारी करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी (०५ नोव्हेंबर) पुतिन यांनी लष्करप्रमुखांना अणु चाचण्या पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. पुतिन यांनी ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा, याच्या एक आठवड्यापूर्वीच ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला न्यूक्लियरप टेस्टिंगचे आदेश दिले होते. सध्या अमेरिका न्यूक्लियर टेस्टिंग करत आहे. याच वेळी पुतिन यांच्या या आदेशाने मोठ्या संकटाची चाहूल व्यक्त केली जात आहे. जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुतिन यांनी राष्ट्रपती सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ही घोषणा जाहीर केली. त्यांनी म्हटले की, अमेरिका असे पाऊल उचलले तर मॉस्को देखील आपल्या अणुचाचण्या पुन्हा सुरु करेल. त्यांनी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि काही महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांना अमेरिकेच्या अणुचाचण्यांमागचा छुपा अजेंडा जाणून त्यांच्या अणुचाचण्या सुरु करण्यास सांगितले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० ऑक्टोबर २०२०५ रोजी अणु चाचण्या पुन्हा सुरु करत असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटले की, रशिा आणि चीनच्या बरोबरीने अमेरिका देखील समान पातळीवर महत्त्वपूर्ण आणि योग्य ते पाऊल उचलेल. परंतु यामध्ये अणुस्फोटकांच्या चाचण्या केल्या जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि रशियाच्या अणु चाचण्यांमुळे मोठ्या शस्त्रास्त्र स्पर्धांची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये चीनही उडी घेण्याची शक्यता आहे. तसेच पाकिस्तान, उत्तर कोरिया देखील यामध्ये सामील होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) ने इशारा दिला आहे की, यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेला मोठा धक्का निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या रशियाच्या आणि अमेरिकेच्या अणु चाचण्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.