अमेरिका नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर ...; अण्वस्त्रांची चाचणी करण्याचे ट्रम्प यांचे सैन्याला आदेश
Donald Trump News: अमेरिका आणि रशियामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तणाव वाढत चालला आहे. या सगळ्यात अमेरिकेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रालयाला, पेंटागॉनला तात्काळ अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. “ट्रुथ सोशल” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला रशिया आणि चीनच्या बरोबरीने अण्वस्त्र चाचण्या करण्याची आवश्यकता आहे.’असे म्हटले आहे.
“इतर देशांच्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर, मी युद्ध विभागाला ताबडतोब स्वतःची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेने शेवटची २३ सप्टेंबर १९९२ रोजी नेवाडा येथे अण्वस्त्र चाचणी घेतली होती, पण त्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी भूमिगत अण्वस्त्र चाचण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचणीसंदर्भात दिलेल्या आदेशांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याचे कारण म्हणजे एक दिवस आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.
दरम्यान, रशियानेदेखील अलीकडेच आपल्या अण्वस्त्रांची चाचणी केली होती. रशिया आणि चीनसोबत वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय़ घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान ट्रम्प यांनी, अमेरिकेकडे जगात सर्वाधिक अण्वस्त्रे असल्याचा दावा आहे. परंतु इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबोलिश न्यूक्लियर वेपन्स (ICAN) नुसार, रशियाकडे अंदाजे 5,500 अण्वस्त्रे आहेत, तर अमेरिकेकडे अंदाजे 5,044 असल्याची माहिती आहे.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी
दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र हल्ल्याची तयारी करण्यासाठी सराव करण्याचे आदेश दिले. रशियन सैन्याने यार्स आणि सिनेवा इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBMs), तसेच Tu-95 बॉम्बरमधून लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. ट्रम्प यांनी या चाचण्यांना उत्तर देताना म्हटले की पुतिन यांनी क्षेपणास्त्र चाचण्यांवर नव्हे तर युद्ध संपवण्यावर लक्ष केंद्रित करावे.
त्यानंतर ट्रम्प यांच्याही अण्वस्त्र चाचणी आदेशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. हे पाऊल जागतिक निःशस्त्रीकरण प्रयत्नांना कमजोर करू शकते आणि १९९२ मध्ये अमेरिकेने स्वाक्षरी केलेल्या अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे (NPT) उल्लंघन मानले जाऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
जर अमेरिकेने पुन्हा चाचण्या सुरू केल्या तर त्यामुळे नवीन शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते,असा IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी) ने इशारा दिला आहे. तर “ट्रम्प अण्वस्त्रांना खेळणी समजत असल्याची टीका अमेरिकन सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी केली आहे. अमेरिकेचे हे पाऊल रशिया आणि चीनच्या वाढत्या अण्वस्त्र प्रभावाला प्रतिसाद म्हणून आहे, परंतु यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेला मोठा धक्का बसू शकतो. असेही बोलले जात आहे.






