Putin sets condition to stop war with ukraine, says not to expand NATO
मॉस्को: गेल्या तीन वर्षापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. परंतु सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहे. शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडूनही दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष युद्ध संपवण्यसाठी अटींवर अटी ठेवत आहे. दरम्यान पुन्हा एकदा पुतिन यांनी युरोपियन युनियनकडे एक मोठी अट ठेवली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
पुतिन यांनी सुरुवातीपासून युक्रेनला नाटोमध्ये सामील करण्यास विरोध दर्शवला होता. दरम्यान त्यांनी पुन्हा ही अट मांडली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नाटोचा पूर्वेकडील विस्तार थांबवण्याची मागणी केली आहे. यासाठी लेखी हमी पुतिन यांनी मागितली आहे. युक्रेनवरी हल्ले रोखण्यसाठी रशियावर लादलेल्या निर्बंधांना उठवण्यासाठी पुतिन यांनी ही खेळी खेळली आहे. पुतिन यांनी रशियन लोकांच्या भविष्यासाठी त्यांच्यावरील निर्बंध उठवण्याची आणि सुरक्षेची मागणीही केली आहे.
युक्रेनवरील हल्ले थांबवण्यासाठी अध्यक्ष पुतिन यांनी पाश्चात्य नेत्यांना नाटोचटा पूर्वेकडील विस्तार थांवण्यास आणि रशियावरील निर्बंध उठवण्यास लेखी प्रतिज्ञा मागितली आहे. तरच रशिया युद्धबंदीसाठी सहमती देईल असे पुतिन यांनी म्हटले आहे.
अद्याप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आता युक्रेन पुतिन यांच्या अटीवर काय निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही काळापासून युरोपियन युनियन रशिया युद्धात युक्रेनच्या बाजून उभा आहे. दरम्यान पुतिन यांच्या नव्या प्रस्तावावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नाटो देशात युक्रेनचा सहभाग पुतिन यांना मान्य नाही, यामुळे आता काय निर्णय घेतला जाईल यावर रशिया-युक्रेन युद्धाचे भवितव्य आहे. हे युद्ध थांबणार की याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला होता. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. दुसऱ्या अध्यक्षकाळाच्या सुरुवातीपासून ट्रम्प यांनी दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अद्याप ट्रम्प यांनी पुतिन यांच्याकडे युद्ध संपवण्याचा आग्रह धरला आहे.गेल्या आठड्यात ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवरुन संवाद देखील साधला होता.