Putin's special gift to PM Modi during his visit in China
Modi Putin Friendship : मॉस्को/नवी दिल्ली : नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनमध्ये भेट झाली आहे. दोन्ही नेते चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी परिषदेनंतर दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय संबंधावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना डिसेंबरमध्ये भारत भेटीचेही आमंत्रण दिले. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना भेटीची पहिली भेट देण्याची घोषणाही केली.
रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाकडून भारताला s-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे प्रणालीचा अतिरिक्त साठा पाठवण्याची घोषणा पुतिन यांनी केली आहे. सध्या यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. S-400 ही रशियाची जमिनीवर क्षेपणास्त्रांचा मारा करणारी सर्वात ताकदवर संरक्षण प्रणाली आहे. यापूर्वी भारताने २०१८ मध्ये यासाठी ५.५ अब्ज डॉलर्सचा रशियासोबत करार केला आहे. याअंतर्गत भारताला पाच s-400 ट्रायम्प सिस्टिमी मिळणार आहे.
चीनच्या वाढत्या लष्करी ताकदीदरम्यान भारताचा हा करार राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा होता. मात्र या कराराला सतत विलंब होत होता. सध्या याच्या दोन युनिट्सची डिलिव्हरी २०२६ आणि २०२७ मद्ये होणार आहे.
Donald Trump Announcement: डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? आज रात्री होणार मोठी घोषणा, चर्चांना उधाण
दरम्यान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी या संदर्भात माहिती देताना बुधवारी (३ सप्टेंबर) सांगितले की, भारताने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाकडू संसाधने खरेदी केली आहे. तसेच रशियाकडून तेल खरेदीही सुरुच ठेवली आहे. यामुळे रशिया भारताच्या या भूमिकेचे आणि त्यांच्या मैत्रीप्रती समर्पणाचे कौतुक करतो असे सर्गेई यांनी म्हटले.
सध्या अमेरिका भारतावर रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास दबाव आणत आहे. भारत याद्वारे रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धात आर्थिक मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. या काराणावरुन अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लादले आहे.
भारत आणि रशिया संबंध
भारत आणि रशियाचे संबंध सोव्हिएत काळापासूनचे आहेत. व्यापार, संरक्षण, उर्जा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांची मजबूत भागीदारी आहे. रशिया गेल्या अनेक काळापासून भारताला अव्वल दर्जाचे संरक्षण साठा पुरवत आहे. यामध्ये T-90 टॅंक, Su-30 MKI लढाऊ विमाने, MiG-29 आणि Kamov हेलिकॉप्टर, INS विक्रमादित्य सारखे विमानवाहू जहाज, यांसारख्या शस्त्रांचा समावेश आहे.
रशियाची S-400 संरक्षण प्रणाली देखील भारताकडे आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानविरुद्ध च्या कारवाईच या संरक्षण प्रणाली अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. यामुळे शत्रूची अनेक क्षेपणास्त्रे सहज नष्ठ करता आली होती. भारत आणि रशियाची ही धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचे पुन्हा एकदा पुतिन यांनी वचन दिले आहे. येत्या काळातही दोन्ही देशांनी कोणत्याही प्रकारच्या दबावापुढे न झुकता कठीण काळात एकमेकांच्या बाजूने उभे राहण्याचे वचन दिले आहे.
‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही…; विक्ट्री डे परेडमध्ये जागतिक नेत्यांसमोर चीनचे लष्करी ताकदीचे प्रदर्शन