Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Quatar Former Emir Death : कतारचे माजी अमिर शेख हमद यांचे निधन; भारतात आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा, PM मोदींकडून श्रद्धांजली

Quatar Former Emir Death National Mourning India : कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारतात आज, सोमवारी (१३ जुलै) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 12:07 PM
Quatar Former Emir Death National Mourning in India

Quatar Former Emir Death National Mourning in India

Follow Us
Follow Us:
  •  कतारचे माजी अमिर शेख हमद यांचे निधन
  • भारतात आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
  • PM मोदींकडून श्रद्धांजली
Quatar Former Emir Death National Mourning in India : नवी दिल्ली/दोहा : कतारचे माजी अमिर आणि कतारला एक नवी ओळख निर्माण करुन देणारे शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर भारत सरकारने सोमवारी (१३ जुलै) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याची अधिकृत माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?

कतारच्या सर्वोच्च सरकारी संस्थेने शेख हमद यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली. त्यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक देशांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

PM मोदींकडून श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, शेख हमद दूरदृष्टी असलेले नेते आणि भारताचे खरे मित्र होते.पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या कतार दौऱ्याची आठवण काढली. तसेच त्यांनी कतारचे विद्यमान अमिर शेख तमीम बिन हमद अल थानी, शाही कुटुंब आणि कतारच्या नागरिकांप्रती तीव्र संवेदनाही व्यक्त केल्या.

कोण होते शेख हमद बिन खलिफा अल थानी?

शेख हमद बिन खलिफा अल थानी यांनी १९९५ ते २०१३ च्या कालावधीत कतारचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांचा प्रभावी वापर करुन देशाला जगातील सर्वाधिक समृद्ध देशांपैकी एक बनवले.

त्यांनी उर्जा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संस्कृती आणि परदेशी गुंतवणूकीलाही चालना दिली. त्यांच्या नेतृत्वात कतारची जागतिक स्तरावरील भूमिका अधिक बळकट झाली. यामुळे त्यांना कतारचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कातरमध्ये शोककळा पसरली आहे.

نشعر بحزن عميق لوفاة الأمير الوالد لدولة قطر، صاحب السمو الشيخ حمد بن خليفة آل ثاني.
​لقد كان قائداً صاحب رؤية، قاد قطر إلى مستويات عظيمة من التطور والازدهار. ونتذكره أيضاً كصديق حقيقي تشرفت بلقائه خلال زيارتي الأخيرة لقطر في فبراير 2024.
​أقدم خالص التعازي لأمير قطر، صاحب السمو…
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2026


Bangkok Pub Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना! पबमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Web Title: Qatar former emir passes away india national mourning pm modi condolences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध
1

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
2

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा
3

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत
4

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.