Russia Earthquake news 8.7 magnitude earthquake hits russia, Russian earthquake video
Russia Earthquake News Marathi : मॉस्को : रशियाची पूर्व किनारपट्टी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरली आहे. या भूंकपाची (Earthquake) तीव्रता८.७ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. यानंतर त्सुनामीचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर रशियातील भूकंपादरम्यानचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्रचंड विनाशाचे दृश्य दिसत आहे.
भूकंपामुळे रशियातील अनेक घरांच्या, दुकानांच्या जमीन हादरल्या आहेत. यामुळे रशियाच्या पॅसिफिक प्रदेशामध्ये गोंधळ उडाला आहे. USGS ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या या भूंकपाचे केंद्रबिंदू कामचटका बेटावरील पेट्रोपाव्लोव्हस्कपासून १३६ किलोमीटर अंतरावर होते. या खोली १९ किलोमीटर खोल होती. हा रशियातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. USGS ने त्सुनामीचा इशाराही दिला आहे.
तसेच जपानच्या (Japan) किनारी भागालाही यामुळे फटका बसण्याची शक्यता USGS ने वर्तवली आहे. याशिवाय अमेरिकेच्या अलास्कासह अनेर राज्यांमध्ये देखील त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. याच वेळू भूकंपाच्या झटक्यांचे व्हिडिओ (VIDEO) देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी जमीन हादरलेली दिसत आहे. तसेच घराती दुकानातील सामान पडताना, अस्थाव्यस्थ झालेले दिसत आहे.
शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा
Breaking – 8.7 Magnitude Earthquake off Russia’s Kamchatka Peninsula.
Tsunami warning for Hawaii and watches along the West Coast of United States.#earthquake #russia
— Kevin W. (@Brink_Thinker) July 30, 2025
यापूर्वी रशियामध्ये दक्षिणेकडच्या चेचन्या प्रांतात ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच २०१३ मध्येही रशिया (Russia) एका शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले होते. गेल्या वर्षी २०२४ मध्ये ११ ऑक्टोबरला झालेल्या भूकंपामध्ये १३ जणांचा बळी गेला होता.
रशिया टेक्टोनिक प्लेस्टच्या कडांवर वसलेला आहे. तसेच याचा पूर्व पॅसिफिक भाग हा रिंग ऑफ फायरचा भाग आहे. यामुळे या प्रदेशात भूकंपाचे, ज्वालामुखीचे उद्रेक सतत होत असतात. यासाठी टोक्टोनिक क्रियाकलाप कारणीभूत ठरतात.
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या खडकांच्या १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, या सततच्या हालचालींमुळे ऊर्जेचा विस्फोट होतो, ज्यामुळे भूकंप घडतात.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी! पुन्हा युद्धबंदीचा दावा अन् टॅरिफ लादण्याची सक्ती