Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेन युद्ध थांबेल का? सौदी अरेबियातील रशिया बैठकीचा अमेरिकेला फायदा, नेमकं प्रकरण काय?

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या राजनियकांनी सौदी अरेबियात बैठक घेतली. रशिया-युक्रेन युद्ध थांबेल का? याबाबत अजूनही स्पष्टता नाही. कारण यावेळी अमेरिका-रशिया संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2025 | 07:20 PM
Russia freed American prisoner ahead of talks with Washington says US embassy

Russia freed American prisoner ahead of talks with Washington says US embassy

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या राजनियकांनी सौदी अरेबियात बैठक घेतली. या बैठकीचा मुख्य उद्देश तीन वर्षापासून सुरु असलेल्या युद्धाचा शेवट करण्यासाठी चर्चा करणे हा होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्ध सुरु राहिल की थांबेल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. कारण या बैठकीत अमेरिका-रशिया संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. तसेच या बैठकी पूर्वीच अमेरिकेला मोठा फायदा झाला होता.

अमेरिकन ड्रग्ज तस्कराला सोडण्याचा रशियाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीपूर्वी रशियाने एक अमेरिकन नागरिक कैलॉब बायर्सला सोडण्याचा निर्णय घेतला. या नागरिकाला ड्रग्स ठेवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, मास्कोच्या व्नुकोवो विमानतळावर बायर्सला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याला 10 वर्षाच्या कारावसाची शक्यता होती. मात्र, रशियाने एक सकारात्मक पावलाचा भाग म्हणून त्याला सोडले आणि अमेरिकन दूतावासाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युक्रेन युद्धावर रशिया-अमेरिकेत चर्चेमुळे युरोपची चिंता वाढली, नेमकं कारण काय?

दोन्ही देशांत दूतावासावरील बंदी हटवली

सध्या सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिकेमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये आपले दूतावास पुन्हा उघडण्यावर सहमती झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दूतावासांमध्ये स्टाफची भरती लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. 2022 मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांनी दूतावास बंद केला होता, मात्र आता तो पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

आणखी एका गुन्हेगाराची मुक्तता

रशियाने बायर्सला सोडण्याच्या आधी अमेरिकेच्या आणखी एका नागरिक मार्क फोगलला मुक्त केले होते. फोगलला 14 वर्षांची शिक्षा झाली होती, मात्र तीन वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली. अमेरिकेने याच्या बदल्यात एक रशियन सायबर गुन्हेगार अलेक्झांडर विनिकला सोडले होते.

अजून 10 नागरिक रशियाच्या कैदेत

अमेरिकेचे आणखी 10 नागरिक रशियाच्या कैदत आहेत. यामध्ये 73 वर्षीय स्टीफन हबर्ड, याला युक्रेनच्या युद्धात भाग घेतल्याच्या आरोपाखाली सात वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. मात्र, त्यांच्या कुटूंबीयांनी दावा केला की, त्याने कधीही शस्त्र उचलले नव्हते. याचप्रमाणे क्सेनिया कारेलिना या रशियन-अमेरिकन नागरिकाला एका अमेरिकी संस्थेला 50 डॉलर देणगी दिल्यामुळे 12 वर्षांची शिक्षा झाली आहे.

सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट का असेल ते सांगणे कठीण आहे, मात्र अमेरिकेन सौदी अरबियात झालेल्या या चर्चेतून आपले हित साधले आहे. या चर्चेतून अमेरिकेने आपल्या नागरिकांची सुटका करुन कूटनीतिक विजय मिळवला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये थोडेफार संबंध सुधारले असून येत्या काळात आणखी काय घडेल हे पाहणे महत्वाचे आहे.

रशिया-अमेरिका संबंधांमुळे युरोप चिंतेत

सध्या रशिया-अमेरिकेच्या वाढत्या संबंधामुळे युरोपने  भीती व्यक्त केली आहे. युरोपच्या मते, या चर्चेमधून शांती करार झाला आणि रशियावर कोणत्याही कडक निर्बंध लागू करण्यात आले नाहीत, तर रशिया पुन्हा आपल्या विस्तारवादी धोरणांना पुढे नेऊ शकतो. विशेषतः पोलंड, बाल्टिक देश आणि जर्मनीला रशियाकडून भविष्यातील आक्रमणाची भीती वाटत आहे. त्यामुळे युरोप युद्धाचा शेवट रशियाच्या स्पष्ट पराभवाने व्हावा, अशी भूमिका घेत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युक्रेनला शांतता चर्चेतून वगळल्याने राष्ट्राअध्यक्ष झेलेन्स्की संतापले; म्हणाले…

Web Title: Russia freed american prisoner ahead of talks with washington says us embassy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ
1

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या
2

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने  Donald Trump ना केली खास मागणी
3

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने Donald Trump ना केली खास मागणी

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा
4

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.