
Russia launches massive drone attack on Ukraine amid talks end war
पुतिन भारतातून परतताच शांततेसाठी हालचाल; अमेरिका-युक्रेनने रशियासमोर ठेवली नवी अट
रशियाच्या या हल्ल्यामुळे युक्रेनच्या वीज केंद्र आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.यामुळे झापोरिझ्झियामध्ये अणुउर्जा प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आला आहे. रिक्टरबंद पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुदैवाने कोणताही मोठा धोका निर्माण झालेला नाही. शनिवारी (०६ डिसेंबर) रशियाने युक्रेनमध्ये सशस्त्र सैन्य दलांसह हे हल्ले केले आहेत. युक्रेनने देखील त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
या हल्ल्यामुळे अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये युद्धबंदीसाठी सुरु असलेली शांतता चर्चा फेल झाली आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह वीटकॉफ यांना फोनवरुन या हल्ल्याची माहिती दिली आहे. याच वेळी युरोपीय नेत्यांनी देखील झेलेन्स्कींनी हल्ल्याचे अपडेट दिले आहेत.
दरम्यान रशियाच्या युक्रेनवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (०८ डिसेंबर) ब्रिटनमध्ये सर्व युरोपीय नेत्यांची रशियाच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या हेतूंबद्दल आणि रशियाच्या सततच्या युक्रेनवरील हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनच्या सुरक्षा हमी आणि अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली शांतता योजनेवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प( Donald Trump) यांनी पुतिन भारत दौऱ्यावरुन परतताच युद्धबंदीसाठी आवाहन केले होते. ट्रम्प यांनी म्हटले होते की, रशिया आणि युक्रेनमध्ये दीर्घकाळ शांततेसाठी आता रशियाच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. दोन्ही देश शांततेवर कायम राहिले तरच दीर्घकाळ युद्धबंदी शक्य आहे. अन्यथा दोन्ही देशांत तणाव सतत वाढेल. निरापराध लोकांच्या हत्या होतील. सध्या हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अमेरिकेने अधोरेखित केली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या आवाहनाला दुर्लक्षित करण्यात आले आहे.