Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, युक्रेनला सुरक्षा हमी मिळणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नुकतेच झेलेन्स्की यांनी फ्लोरिडा येथे अमेरिका आणि युक्रेनिय अधिकाऱ्यांसोबत युद्धबंदीसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत अमेरिकेने मांडलेल्या शांतता प्रस्तावर आणि त्यातील सुधारणांवर चर्चा करण्यात आली. ही योजना अमेरिका आणि रशियामध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु यामध्ये पूर्णत:रशियाच्या हिताच्या अटी होत्या. याला युरोपियन राष्ट्रांनी विरोध केला आहे. युरोपीयन राष्ट्रांच्या मते, अमेरिका रशियाला जास्त महत्त्व देत आहे. हे युक्रेनच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. युरोपियन राष्ट्रांनी केवळ अमेरिकेच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनला सुरक्षा पुरवण्यावर चर्चा झाली. मॅक्रॉन यांनी इतर मित्र युरोपियन राष्ट्रांना यु्क्रेनला ठोस सुरक्षा हमी देण्याचे आवाहन केलेआहे. जर रशियाच्या बाजूने पक्षपाती युद्धबंदी झाली तर याचा दोन्ही देशांमध्ये संतुलन राखण्यावर प्रभाव पडू शकतो. यामुळे अमेरिकेच्या शांतता योजना दोन्ही देशांच्या हिताची असावी. दोन्ही देशांनी जर्मनी, पोलंड, ब्रिटन, आणि नाटो सरचिटणीसांनी युरोपीय मित्र राष्ट्रांसोबत चर्चा करण्याचे आमंत्रण दिले आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या २८ कलमी योजनेला रशियाने मान्यता दिली आहे. यामध्ये युक्रेनला त्यांची सैन्य शक्ती कमी करावी लागणार आहे, तसेच युक्रेनच्या नाटो देशात सहभागही रोखण्यात येईल आणि युक्रेनचा काही प्रदेश रशियाला सोपवायचा अशा, तरतुंदाचा या योजनेत समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) अमेरिकेच्या सल्लागार स्टीव्ह वीटकॉफ यांची भेट घेणार आहे.
यामुळे युरोपीयन नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, अमेरिका आणि रशिया चर्चांमुळे युक्रेनसाठी अधिक धोका निर्माण होत आहे. यामुळे युक्रेनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मॅक्रॉन यांनी युरोपीय देशांना आवाहन केले आहे.
Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?






