
Russia President Vladimir Putin in Kyrgyzstan for Strategic Partnership
अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
बिश्केक येथील जपारोव्ह विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून ते सध्या राष्ट्रपती निवासस्थानत यंतिमक ओर्डो येथे गेले आहेत. या ठिकाणी रशिया आणि किर्गिस्तानमध्ये द्वीपक्षीय संबंध चर्चा होणर आहे. बिश्केक हे नेत्रदीपक सौंदर्यासाठी ओळखले जाते. यापूर्वी इथे अनेक आंतरराष्ट्रीय शिखर परिषद पार पडल्या आहेत.
किर्गिस्तान हा रशियाचा अत्यंत जवळचा मित्र आहे. दोन्ही देश युरेशियन इकॉनॉमिक युनियन (EAEU) आणि सामूहिक सुरक्षा करार संघटनेचे (CSTO) सदस्य आहेत. आज दोन्ही देशात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. याचा हेतू रशियाचा मध्य आशियामध्ये प्रभाव वाढवणे आहे.
किर्गिस्तान आणि रशियामध्ये द्विपक्षीय व्यापार संबंधावर आणि आर्थिक सहकरार्य वाढवण्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच दोन्ही देशात उर्जा क्षेत्रात नवीन जलविद्युत प्रकल्प सुरु करण्यावरही चर्चा होण्याची शकक्यत आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रशियाच्या लष्करी तळांवर दोन्ही देशांमध्ये आढावा घेतला जाईल. तसेच सांस्कृतिक आणि मानवतावादी संबंध दृढ करणे हा देखील याचा हेतू असणार आहे. याशिवाय ट्रम्पसोबत सुरु असलेल्या युक्रेनबाबतच्या शांतता चर्चेवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
🚨🇷🇺🇰🇬 President Putin arrives for key talks in Kyrgyzstan Vladimir Putin has arrived at the Yntymak Ordo Residence in Kyrgyzstan, where he will now hold official negotiations with President Sadyr Japarov. pic.twitter.com/gb6ImAl0mp — Sputnik (@SputnikInt) November 26, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War)हा या भेटीतील सर्वात महत्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. रशिया हा किर्गिस्तानचा महत्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. दोन्ही देशांतील मैत्राला उंचीवर नेणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय करांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान पुतिन यांच्या किर्गिस्तान दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे. रशियाच्या मध्य आशियातील प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
अमेरिकेनंतर आता रशियाही करणार अणु चाचणी? पुतिन यांनी सैनिकांना दिले तयारी करण्याचे आदेश
Ans: रशियाचे अध्यक्ष पुतिन किर्गिस्तानच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत.
Ans: पुतिन यांच्या किर्गिस्तानच्या दौऱ्याचा मुख्य हेतू रशियाचा मध्य आशियातील प्रभाव वाढवणे आहे.