
Muhammad Yunus and Shehbaz Sharif
शत्रूचा शत्रू आपला मित्र! बांगलादेश आणि पाकिस्तान वाढतीये जवळीक; भारताची डोकेदुखी वाढणार?
मिडिया रिपोर्टनुसार दोन्ही देशात संरक्षण सहकार्य करण्यात आला आहे. या करारांतर्गत पाकिस्तानकडून बांगलादेशला मोठी शस्त्रे मिळणार आहेत. नुकतेच पाकिस्तानच्या हेवी इंडस्ट्रीज तक्षशिला विभागाचे (HIT) प्रमुख लेफ्टनंट जनरल शाकिर उल्लाह खटक यांनी बांगलादेशला भेट दिली होती. तसेच रविवारी (२३ नोव्हेंबर) बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान आणि पाकिस्तानचे संरक्षण उत्पादन क्षेत्राचे वरिष्ठ प्रतिनिधींमध्ये देखील बैठक झाली होती. या भेटीमुळे बांगलादेश पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या पाकिस्तानकडे टँक, चिलखती वाहने, APC असॉल्ट रायफल आणि लष्करी वाहने तयार करणा HIT शस्त्रे आहेत. ही शस्त्रे बांगलादेशला पुरवली जाण्याची शक्यता आहे. बांगलादेशने पाकिस्तानकडून टँकमध्ये आर्मर्ड कॅरियर्स(ACP), आर्मर्ड फायटिंग व्हेइकल्स, असॉल्ट रायफल्स आण काही लहान शस्त्रांची मागणी केली आहे. तसेच चिनी बनावटीची लष्करी हार्डवेअर्स, वाहने, लॉजिक्टिक्स प्लॅटफॉऑर्मचाही यामध्ये समावेश आहे.
बांगलादेशात शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या सत्तांतरानंतर मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेृत्त्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. युनूस पाकिस्तान-समर्थित प्रभावाखील काम करतात असा आरोप त्यांच्यावर आहे. कट्टरपंथी आणि अतिरेकी गटांना देखील बांगलादेशात संधी मिळत आहे. या गटांच्या सल्ल्यानुसार बांगलादेश सरकार पाकिस्तान सोबत लष्करी संघर्ष वाढवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आतापर्यंत बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान चार लष्करी बैठका झाल्या आहेच. या भेटीमध्ये दोन्ही देशांनी गुप्तचर माहितीची देवणा-घेवाण, लष्करी प्रदक्षिण, संयुक्त सराव आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीचे नियोजने केले आहे.यामुळे दोन्ही देशात मोठा संरक्षण करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या भारतासाठी मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे. एकीकडे पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये देखील न्यूक्लियर शील्ड मॉडेल संरक्षण कराराची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे बांगलादेश आणि पाकिस्तानची वाढती लष्करी जवळीक चिंतेचे कारण ठरत आहे. यामुळे भारताला पूर्व आणि पश्चिम अशा दोन आघाड्यांवर आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.