
Russia to Vote on Key Defence Pact with India Ahed of Putin's Visit
अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
मिळालेल्या माहितीनुसार, आज रशियाच्या संसदेत भारत आणि रशियात एक मोठा संरक्षण कराराची तयारी होत आहे. आज यावर संसदेत मतदान होणार आहे. यामुळे दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य मजबूत होणार आहे. पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी हा करार झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशाचे संबंध अधिक मजबूत होणार आहे.
रशियाच्या वरिष्ठ सभागृहाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२ डिसेंबर) एक महत्त्वाचा संरक्षण करार मजूंर करण्यासाठी मतदान होणार आहे. भारत-रशियात रेसिप्रोकल लॉजिस्टिक्स एक्सचेंज (RELOS) वर मदतहान होणार आहे. याचा उद्देश दोन्ही देशात संयुक्त लष्करी सराव, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर काही महत्त्वाच्या कामांमध्ये समन्वय साधणे आहे. याअंतर्गत १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मॉस्को येथे भारताचे राजदूत विनय कुमार आणि तत्कालीन उपसंरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन यांनी दोन्ही देशात विशेष अधिकाराअंतर्गत धोरणात्मक भागीदारी सहकार्य वाढवण्यासाठी संरक्षण करारावर स्वाक्षरी केली होती.
यापूर्वी पुतिन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सल्लागार स्टीव्ह वीटकॉफ यांची भेट घेणार आहेत. यामुळे भारत आणि रशिया संंबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुतिन यांची स्टीव्ह वीटकॉफशी भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. ही बैठक रशिया आणि युक्रेन मध्ये शांतता करार आणि ट्रम्प यांच्या २८ कलमी योजनेवर आधिरत असल्याची माहिती मिळाली आहे. रशियाचे अध्यक्ष प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी याची पुष्टी केली आहे.
भारतासाठी बैठक का महत्वाची?
पुतिन आणि विटकॉफ यांची भेट भारतासाठीही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण याचा भारत आणि रशिया संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रशिया आणि अमेरिकेतील तणावामुळे भारतावर सध्या अमेरिकेने ५०% कर लादला आहे. पण दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यास हा कर कमी होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये S-500 आणि सुखोई-५७ विमानांसाठी भारताच्या करारवर देखील अमेरिका दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थिती पुतिन आणि वीटकॉफ यांच्या भेटीचा भारत-रशियाच्या संरक्षण करारवर परिणाम होईल.
Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?
Ans: पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी रशियाच्या संसदेत भारत आणि रशियात एक मोठा संरक्षण कराराची तयारी होत आहे. आज यावर संसदेत मतदान होणार आहे.
Ans: रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ४ ते ५ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहेत.