Russia Ukraine war, buildings turned into rubble, three dead, many injured Russian drones and missiles wreaked Ukraine
कीव: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा बदला रशियाने घेतला आहे. ६ जून २०२५ मध्ये रोजी रशियाने कीवसह युक्रेनच्या अनेक भागावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात अनेक इमारतींचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी आहेत.
रशियाने हा हल्ला केवळा युक्रेनच्या कारवाईला प्रत्युत्तर नसून त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे म्हटले आहे. हल्ला सुरु केल्यानंतर रशियाने अवघ्या तीन तासांत युक्रेनवर ४०० हून अधिक ड्रोन हल्ले आणि ४५ क्षेपणास्त्रे डागली होती. यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. स्थानिक अधिकारी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात व्यवस्त होते.
जूनच्या सुरुवातील युक्रेनने रशियाच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यामुळे रशिया संतापला होता. आता या हल्ल्याचा बदला रशियाने घेण्याचे आवाश्वासन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिले होते. रशियाने गुरुवारी पहाटेपासून युक्रेनच्या राजधानी कीव आणि इतर भागांवर लक्ष्य करण्यास सुरुवात केले. यामुळे युक्रेनमध्ये सर्वत्र स्फोटांचा आवाज येऊ लागले होते.
कीव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात १३ इमारतींचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. कीव, टेर्नोपिल, खमेलनित्सिकी ओबाल्ट,खार्किव, ल्विव्ह आणि लुत्सक या भागांमध्ये रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला आहे. खार्किवमध्ये रात्रीच्या वेळी बहुमजली इमारतींना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे इमारती काही मिनिटांमध्ये मलब्यामध्ये रुपांतरित झाल्या. या हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिथ ठिकाणी स्थलांतर केले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
युक्रेनने रशियाच्य ओलेन्या आणि बेलाया या लष्करी तळांवर ऑपरेशन स्पायडर बेव अंतर्गत हल्ला केला होता. या हल्ल्यात रशियाचे ४० बॉम्बर्स उद्ध्वस्त झाले होते. तसेच लढाऊ विमाने देखील नष्ट झाली होती.
यामुळे रशियामध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण होते. दरम्यान रशियाने ६ जून च्या पहाटे रशियावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव करुन हल्ल्याचा बदला घेतला. हा हल्ल्या इतका तीव्र होता की, युक्रेनियन सैन्याला सावरण्याची संधीही मिळाली नाही.
या हल्ल्याच्या एक दिवस आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी रशिया लवकरच युक्रेनच्या कारवाईला प्रत्युत्तर देईल असे स्पष्ट शब्दात सांगतिले होते.