युक्रेनसह युरोपीय देशांमध्ये पसरली रशियाची दहशत; नाटो देशांच्या हालचालींने दिले तिसऱ्या महायुद्धाचे संकेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात रशियाचे लढाऊ विमाने नष्ट झाली. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली होती. यानंतर रशियामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. परंतु यानंतर रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला करण्याची तयारी सुरु केली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे युक्रेनसह युरोपीय देशांमध्ये रशियाची दहशत पसरली आहे.
युक्रेनच्या हल्ल्यानंतर पुतिन सूडाच्या आगीत पेटत आहे आणि कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करु शकतात. यामुळे युक्रेनला मदत करणाऱ्या देशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पुतिन यांनी यापूर्वीही स्पष्ट केले होते की, युक्रेनला मदत करणाऱ्या युरोपीय देशांवर देखील कारवाई करण्यात येईल. यामुळे रशियाकडून संभाव्य धोक्याची भीती निर्माण झाली आहे. युरोपीय देश आणि उत्तर अटलांटिक करार संघटना नाटोही चिंतेत आहेत. नाटो देशांनी रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणेत वाढ केली आहे.
ब्लूमबर्गने जारी केलेल्या अहवालानुसार, रशिया आणि युक्रेनमधील वाढत तणाव युरोपीय देशांसाठी धोका निर्माण करत आहे. यामुळे युरोपीय देशांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी नाटोने प्रयत्न सुरु केले आहेत. नाटोच्या सचिवांनी अनेक सुरक्षा उपायोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. यावरुन तिसऱ्या महायुद्धचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रशिया नाटोच्या वाढत्या शक्तीला स्वत:साठी धोका मानतो. सुरुवातील रशियाला नाटो देशांमध्ये सामील व्हायचे होते. परंतु नंतर पुतिन यांनी हा निर्णय बदलला. तसेच नाटोचा विस्तार थांबवण्याची मागणी केली. सध्या रशिया-युक्रेनमधील वाढता तणाव युरोपीय देशांसाठी धोक्याची घंटा आहे. तसेच ट्रम्प प्रशासनानेही युरोपला सुरक्षेची हमी देण्यास नकार दिला आहे. याशिवाय ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी चर्चा करण्यासही नकार दिला आहे. यामुळे नाटो देशांनी ५ जून रोजी ब्रुसेलमध्ये होणाऱ्या बैठकीत नाटोचे संरक्षण वाढवण्यावर चर्चा करणार आहे.
नाटोच्या सदस्य देशांनी हवाई संरक्षण क्षमतेत पाच पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये ड्रोन, क्षेपणास्त्रे लढाऊ विमाने सर्व प्रकारची शस्त्रे वाढवण्याचा विचार केला आहे. नाटोच्या एका सदस्य अधिकाऱ्याने अशी माहिती दिली.
रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव पाहता नाटोचे सरचिटणीस यांनी आपण युद्धासाठी तयारी सुरु केली पाहिजे असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, यासाठी युरोपीय देशांना संरक्षण क्षणता वाढवण्याची आणि मजबूत करण्याची गरज आहे. युद्ध लढण्यासाठी पूर्णत: तयार राहणे गरजेचे आहे. या सर्व चर्चांदरम्यान रशियाने आपले प्राणघातक शस्त्रे देखील बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तिसरे महायुद्ध भडकणार अशा शक्यता व्यक्त केली जात आहे.