Russia-Ukraine War PM Zelensky To Offer Territory Swap With Russia
कीव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसध्या रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत असून दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवूमन आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियासोबत शांतता चर्चेसाठी मोठी तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी रशियाला एक मोठी ऑफर दिली आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युद्ध थांबवण्यासाठी झेलेन्स्की रशियाला कुर्स्क प्रदेश परत करण्यास तयार सांगितले आहे.
अमेरिकेच्या दबावामुळे कुर्स्क प्रदेश रशियाला पर देणार
यूक्रेनने सहा महिन्यांपूर्वी कुर्स्कच्या क्षेत्रावर ताबा मिळवला होता. मात्र, आता अमेरिकेच्या युद्धबंदीच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी हा प्रदेश परत देण्याचे ठरवले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी सांगितले की, “युरोपला एकट्याला यूक्रेनच्या युद्धाचा भार पेलणे शक्य नाही. यासाठी अमेरिकेकडून सुरक्षेच्या हमीची आवश्यकता आहे. अमेरिकेच्या शिवाय खरी सुरक्षा हमी मिळू शकत नाही.”
शांततेने युद्ध संपणार?
अमेरिकेच्या उपाध्यक्ष जेडी वेंस यांच्यासोबत झेलेन्स्कींची म्यूनिख सुरक्षा परिषदेमध्ये बैठक होणार असून ही या बैठकीदरम्यान तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धाला अमेरिकेने शांततेने संपवण्याचा आग्रह धरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांत शांतता करार व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, यूक्रेनला अद्याप काही अटी मान्य नसल्याचे दिसून येत आहे.
झेलेन्स्कींनी रशियाला कुर्स्क क्षेत्र परत देण्याचा विचार केला असून या बदल्यात कोणते क्षेत्र मिळवायचे निर्णय त्यांनी अद्याप स्पष्ट सांगितलेला नाही. त्यांनी म्हटले की, “आमच्यासाठी सर्व क्षेत्र महत्त्वाचे आहेत. कोणत्याही एका भागाला प्राधान्य दिले जाणार नाही.” रशियाने क्रीमिया, डोनेट्स्क, खेरसॉन, लुहान्स्क आणि जापोरिजिया या पाच क्षेत्रांवर ताबा घेतल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
मदत करणाऱ्या देशाला पुनर्निर्माणासाठी प्राधान्य देऊ- झेलेन्स्की
झेलेन्स्की यांनी युद्धबंदीच्या करारासाठी अमेरिकेची हमी मिळावी अशी मागणी केली आहे. अशा कोणत्याही करारात कडक लष्करी अटी नसतील तर रशिया पुन्हा नव्याने हल्ल्यासाठी सज्ज होऊ शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, त्यांनी यूक्रेन अमेरिकन कंपन्यांना पुनर्निर्माणासाठी मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ” ज्या देशांनी आम्हाला मदत केली आहे, त्यांना आम्ही पुनर्निर्माणासाठी प्राधान्य देऊ.”