युद्ध पुन्हा पेटणार? 'या' कारणामुळे हमास आणि इस्त्रायलमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेल अवीव: सध्या इस्त्रायल आणि हमासच्या युद्धबंदी करार सुरु असून यातील पहिला टप्पा संपला आहे. दरम्यान आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला अल्टीमेटम दिला आहे की, जर शनिवार इस्त्रायली बंधकांची सुटका झाली नाही, युद्धविराम करार समाप्त होईल. नेतन्याहू यांनी हमासच्या युद्धविराम उल्लंघनावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सुरक्षा व राजकीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, “जर हमासने शनिवारपर्यंत आमचे सर्व बंधक सोडले नाहीत, तर युद्धविराम संपेल आणि इस्रायली संरक्षण दल (IDF) हमासला निर्णायक पराभूत करण्यासाठी पुन्हा युद्ध सुरु करेल.” त्यांनी हे स्पष्ट केले की, हा निर्णय सर्व कॅबिनेट सदस्यांनी एकमताने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील हमासला ओलिसांच्या सुटकेचा इशारा दिला होता.
इस्रायली अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्हाला आशा आहे की येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने सर्व ओलिसांची सुटका करण्यात येईल, पण ती शनिवारीच होईल असे आवश्यक नाही. शनिवारी तीन ओलिसांची सुटका होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित नंतरच्या टप्प्यात सुटतील.”
नेतन्याहूंनी ओलिसांच्या स्थितीवर केली नाराजी व्यक्त
नेतन्याहू यांनी बंधकांच्या ओलिसांच्या सुटकेनंतर त्यांच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “आम्ही चार तासांची सविस्तर बैठक घेतली. गेल्या शनिवारी सुटलेल्या तीन बंधकांची अत्यंत वाईट अवस्था पाहून आम्ही नाराज आहोत.” याशिवाय, नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओलिसांच्या सुटकेसाठी दिलेल्या मागणीचे स्वागत केले. तसेच, गाझाच्या भविष्यासाठी ट्रम्प यांच्या दृष्टिकोनाचे स्वागत केले.
गाझा क्षेत्रात पुन्हा इस्त्रायली सैन्य तेनात
गाझा सीमा क्षेत्रात इस्रायली सैन्य तैनात करण्याचे आदेश नेतन्याहूंनी दिले आहेत त्यांनी म्हटले आहे की, “हमासने बंधकांची सुटका न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी इस्रायली सैन्याला गाझा पट्टीच्या आत आणि आजूबाजूला सैन्य जमवण्याचे आदेश पुन्हा एकदा दिले आहेत. ऑपरेशन सुरू आहे आणि लवकरच पूर्ण होईल.”
युद्ध पुन्हा सुरु होणार?
मिळालेल्या माहितीननुसार, सर्व ओलिसांच्या सुटका झाल्याशिवाय युद्विरामासंदर्भात कोणतीही दुसरी चर्चा होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारपर्यंत तीन ओलिसांची सुटका झाली तरच युद्धविराम सुरु राहणार आहे, असे न झाल्यास मध्येपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध सुरु होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे युद्धविरामाचा निर्णय आता हमासच्या पुढील कृतीवर अवलंबून आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हमासने आणखी 3 ओलिसांची केली सुटका; 183 पॅलेस्टिनीही लवकरच घरी परतणार